Zika virus in maharashtra : झिका व्हायरस माहिती जाणून घ्या झिका विषाणूची लक्षणे

झिका व्हायरस विषयी संपूर्ण माहिती

झिका व्हायरस विषयी माहिती 

        महाराष्ट्रात नवीन संकट निर्माण झाले आहे. राज्यात झिका या विषाणूचा एक रुग्ण सापडलेला आहे. आधीच कोरोनाच  या संकटाचा सामना करत असताना आता नव्या योजनेचा राज्यात पाऊल टाकलेल महाराष्ट्रात झिका विषणू चा पहिला रुग्ण आढळल्या नंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महाराष्ट्रात आता झिका चा धोका !

        पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा एक रुग्ण आढळला असून हा महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण आहे. बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा रुग्ण आढळला असून बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिका व्हायरसची लागण झाल्याचं 30 जुलै रोजी समोर आला आहे. या महिलेला चिकनगुनिया देखील झाल्याचे समोर आलं आहे. मात्र उपचारा अन ती ही महिला बरी झाली आहे अशी माहिती पुणे आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानंतर आज 31 जुलै रोजी राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकानं बेलसर गावात जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे.
        कोरोना ची लाट ओसरत नाही तेव्हाच पुण्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा महाराष्ट्र मध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे.

काय आहे झिका विषाणू व लक्षणे ( symptoms of zika virus )

        झिका विषाणू आजार हा एडीस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार असून या आजाराचे 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येत नाहीत. व इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ येणे, सांधे दुखी अशी लक्षणे आढळून येत आहेत.
        या आधी भारतात 2016-17 मध्ये गुजरात राज्यात झिका व्हायरस या संसर्गाचे प्रकरण समोर आले होते. झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. या विषाणूमुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment