Jobs : आपल्या मुलांना या क्षेत्रांत मिळतील जास्त पगाराच्या नोकऱ्या…

Job Update : प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आयुष्यात आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तर आज त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळे क्षेत्रांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ( Which sector has the highest paying jobs? )

बिग डाटा इंजिनियर / Big Data Engineer

विविध सेक्टर मधून जमा केलेले डाटाचे आनलिसिस, असेसमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन करण्याचे काम हे बिग डाटा इंजिनिअर्सना करावी लागत असते. त्यामुळे एखाद्या व्यवसायाची भरभराट करण्यासाठी प्रॉडक्टिव्हिटी व रेवेन्यू वाढवण्यासाठी योग्य प्रकारे असेसमेंट करण्यात येते. यामध्ये आज-कालच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ओढ दिसून येते तसेच डाटा म्हणजेच एक मोठ्या प्रकारचे संपत्ती आहे.

डाटा सायंटिस्ट / Data Scientist

डाटा सायंटिस्ट या पदासाठी काम करताना प्रचंड मोठे आणि गुंतागुंतिच्या माहितीजाला साठी काम करावे लागत असते. तसेच मशीन लर्निंग (Machine learning) आणि ॲक्शनेबल इनसाइट्स या प्रक्रियेसाठी वापरल्या जात असतात.

ए आय कन्सल्टन्टस / AI Consultants

यामध्ये ग्राहकांना उपयोगाचे स्वयंचलित उपक्रम तयार करून देण्यात सहकार्य करणे हे आर्टिफिशियल कन्सल्टंन्टसचे काम असते. विविध शक्यतांमधून उत्तमोत्तम काम होण्यासाठी हे सतत इंजिनिअर्स आणि इतर तज्ञांची चर्चा करत असतात. जे की आत्ता ChaGPT आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर करियर आहे.

बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर / Business Intelligence Developer

बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर आपल्या व्यवसायाच्या भरभरासाठी व वेगवेगळ्या किचकट माहिती आपल्या व्यवसायामध्ये तपासणे, तसेच मार्केट व्यवसायात कोणते ट्रेंड्स (Trends) सुरू आहेत, याची माहिती घेणे हे यांचे मुख्य काम असते.

हेही वाचा : भारतात कोन -कोणत्या ठिकाणी आहेत सोन्याच्या खानी पहा इथे संपूर्ण माहिती

कम्प्युटर व्हिजन इंजिनियर / Computer Vision Engineer

कॉम्प्युटर व्हिजन इंजिनिअर संवेदनशील माहितीचा उकल करणे व त्याचा योग्य अर्थ लावताना संगणकाला मदत करण्यासाठी मशीन लर्निंग आणि कम्प्युटर व्हिजन टेक्निक चा वापर करण्यात येईल, फिल्म, फोटोज आणि इतर इन्फॉर्मेशन ची ओळख पटवणे व त्याच्या वर्गीकरणासाठी सिस्टम डेव्हलमेंट ( System Development ) करताना इतर इंजिनियर्स बरोबर त्यांना काम करावे लागत असते. यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती शिकायला मिळते व तसेच ते आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो.

बिझनेस डेव्हलपमेंट / Business Development

बिझनेस डेव्हलपमेंट हे आत्ताच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे एक प्रकारचे तंत्र आहे. तसेच यामध्ये वाढीच्या शक्यता, धोरणे विकसित करणे हे यांचे मुख्य काम आहे तर इतर मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्हज बरोबर ते समन्वयाने काम करत असतात. तसेच सहकार्यांसाठी वेगाने पुढे येणाऱ्या कंपन्यांवर त्यांची कायम नजर असते.

रिसर्च सायंटिस्ट / Research Scientist

रिसर्च सायंटिस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील रिसर्च सायंटिस्ट चे स्थान महत्त्वाचे असते. ते स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर व्हिजन, लर्निंग टेक्निक्स, मॅथेमॅटिक्स अशा विविध क्षेत्रांची तज्ञ असतात व अशा तज्ञांची आजच्या काळात मोठ्या प्रमाणात गरज आहे. आपण असे रिसर्च सायंटिस्ट स्किल डेव्हलप करून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी मिळू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories job

Leave a Comment