Monday, October 2, 2023
HomeUncategorizedWhat is the use of salt in the body? मिठाचा शरीराला काय...

What is the use of salt in the body? मिठाचा शरीराला काय उपयोग असतो

खाल्लेल्या मिठाला जागण्या विषयी हिंदी चित्रपटांमध्ये / इतरत्रही बरीच जोशपूर्ण वाक्य एकतो मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड मिठाचे शरीरातील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे ज्याचे मीठ खातो त्याच्याशी निष्ठा ठेवावी कारण जणू मिठाचा रूपाने आणि तो जीवनच देत असतो असा अर्थ वाक्यात अभिप्रेत असावे.

शरीराच्या सर्व पेशींमध्ये तसेच पेशी बाहेरील द्रव्यांत सोडियम असते. पेशींच्या कार्यासाठी सोडियमचे पेशीच्या आतील व बाहेरील प्रमाणावर नियंत्रण ठेवावे लागते. पेशींच्या आत पोटॅशियम खूप प्रमाणात असते तर बाहेरील द्रवात सोडियम जास्त प्रमाणात असते. पेशींमधील विद्युत प्रभार यासाठी सर्व विद्युत रासायनिक प्रक्रियांसाठी सोडियम आवश्यक असते मज्जासंस्थेच्या मार्फत होणारे संदेशवहन आदेशवहन देखील पेशींतील सोडीयमचा कार्यामुळे शक्य होते.शरीरातील 100 ग्रॅम सोडियम आयन असतात. प्रौढांना दर दिवशी 10 ते 15 ग्रॅम मिठाची गरज असते. खूप उलट्या, हगवण, अति घाम येणे, इत्यादी मुळे सोडीयमचे शरीरातील प्रमाण कमी होते. याचा परिणाम म्हणून थकवा येणे, डोळे खोल जाणे, चक्कर येणे, हाता पायाला गोळे येणे अशी लक्षणे दिसतात. तरीही सोडियमचे मेंदुतील पुरवठा न झाल्यास पेशींचे कार्य नीट होत नाही. झटके येणे, बेशुद्धावस्था येणे या क्षणानंतर व्यक्ती मृत्युमुखी पडतो.
What is the use of salt in the body?   मिठाचा शरीराला काय उपयोग होतो?
जुलाब हगवणी मध्ये सोडियम व पाणी या दोहोंच्या अभावाच्या दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे मीठ, साखर, पाणी यांचे द्रावण (जीवनजल) पाजून रुग्णास बरे करता येते.जंतुसंसर्गाचा उपचार करण्याआधी जीवन जल देणे महत्त्वाचे ठरते. तोंडाने घेऊन शकणारे तसेच बेशुद्ध अवस्थेतील रुग्णांना उलट्या होणाऱ्या रुग्णांना शिरे वाटे द्यावी लागते. असे हे मीठ जास्त झाले तर जेवण खारट बनते. उच्च रक्तदाब व त्याने हृदयविकाराची शक्यता वाढते. पण कमी झाले तर जेवण अळणी बनते आणि खूपच कमी झाले तर जीवनात संपुष्टात येऊ शकतो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments