Type of loan in India | तुम्ही कर्ज कोण कोणत्या पद्धतीने काढू शकतात पहा इथे संपूर्ण माहिती

Type of loan in India: तुम्ही पाहत असाल की आपल्या देशामध्ये विविध प्रकारची कर्जे उपलब्ध आहेत. ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्जाचा प्रकार हा तुम्ही निवडू शकता. तुम्ही पाहत असाल की बहुतेक लोक हे वैयक्तिक कर्ज हा पर्याय निवडत असतात कारण त्यांना विविध प्रकारची कर्जाची माहिती नाही चला तर मग आज आपण सर्व प्रकारच्या कर्जांचे माहिती घेऊ.

कर्जाचे प्रकार हे खालील पद्धतीने आहेत Types of loans 

गृहकर्ज Home loan 

गृहकर्ज म्हणजे स्वतःचे घर घेण्याचे प्रत्येकाचे हे स्वप्न असते पण पैशाच्या कमतरतेमुळे आपण घर घेऊ शकत नाही म्हणून बँक हे तुम्हाला गृहकर्ज देत असतात त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घरे बांधू शकतात. यामध्ये सुद्धा बरेच प्रकारचे कर्जाचे प्रकार आहे.

शैक्षणिक कर्ज Educational loan 

शैक्षणिक कर्ज शैक्षणिक कर्ज हे अशा विद्यार्थ्यांना दिले जाते की त्यांचे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या किंवा स्वतंत्रपणे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शैक्षणिक कर्ज एक चांगल्या प्रकारची संधी देत असतात. एकदा ज्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली की ती त्यांच्याकडून कर्जाची रक्कम परत केली जाते व ती परत करणे अत्यंत आवश्यक असते.

वैयक्तिक कर्ज Personal loan 

वैयक्तिक कर्ज एखादा व्यक्ती काही त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्जासाठी हा अर्ज करत असतात. जसे की, काही मागील कर्ज फेडण्यासाठी किंवा इतर तुमच्या वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अशा प्रकारच्या कर्जाच्या तुलनेत कर्जाचा व्याजदर हा 10% ते 14% इतका जास्त असतो.

कृषि कर्ज Agricultural loans 

सध्याच्या काळात भारत सरकार हे अनेक बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत म्हणून अनेक कर्ज योजना उपलब्ध करून देत आहेत. या कर्जावर कमी व्याजदर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे असतील, शेतीसाठी महत्त्वाची उपकरणे असतील किंवा इतर काही गोष्टी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाते व ते कर्ज शेतकरी हे पीक उत्पादन आणि विक्री नंतर कर्जाची परतफेड करता येते.

सोने कर्ज Gold loan 

सोने कर्ज हे तुम्हाला बँकेमध्ये लवकरात लवकर दिले जाते. भारतातील अनेक अर्जांपैकी सुवर्ण कर्ज हे उपलब्ध सर्वात जलद आणि सुलभ प्रकारचे कर्ज आहे. या काळामध्ये सोन्याचे दर हे वाढत चालले आहेत. त्या काळात हे कर्ज खूप लोकप्रिय होते. तरी सध्याच्या काळात तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने सोने कर्ज घेऊ शकतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment