Cars : नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहे का? तर आधी ‘या’ 5 गोष्टींविषयी जाणून घ्या

New Cars Buy : आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपले एक स्वप्न असते की आपल्याकडे एक स्वतःची एक फोरविलर असावी. तर अशा मध्येच आपल्या भारतामध्ये कार खरेदी करणे ही एक विशेष प्रक्रिया सुद्धा आहे.

तर यासाठी प्रत्येकाला नवीन कार घरी आणण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत तसेच मोठ्या प्रमाणात आपल्याला गुंतवणूक सुद्धा करावी लागते. यासाठी येथे प्रक्रिया हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर आज आपण ही प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

या प्रक्रियेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो नवीन कार खरेदी करणे हे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. आज आपण कार खरेदी करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. तर आपण एकूण पाच गोष्टींची आपण काळजी घेणे आवश्यक असते. या गोष्टींमुळे तुम्हाला कार खरेदी करणे थोडेफार का होईना सोपे ठरू शकते.

तुम्हाला कार कोणत्या प्रकारची हवी आहे?

सर्वप्रथम काय खरेदी करत असताना आपण ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की, आपल्याला कार कोणत्या प्रकारची खरेदी करावयाची आहे. आपले कुटुंब, रोजचे रनिंग, चालवण्याची पद्धत आणि आपले सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले बजेट किती पर्यंत आहे त्यावर हे ठरवावे लागते.  आम्ही तुम्हाला खाली काही कंपनीनुसार काही कारची नावे तुम्हाला देत आहोत.

  • हॅचबॅक कार्स मध्ये : ( वॅगनआर, टीयागो, ग्रँड i10, स्विफ्ट, आणि बलेनो आणि अन्य ) 
  • सेडानमध्ये: ( डिझायर, अमेझ आणि अन्य )
  • हॅचबॅक आणि सेडाननंतर SUV मध्ये ( पंच, आगामी एक्स्टर, क्रेटा इ. ) या वरती दिलेल्या कंपन्यांमध्ये तुम्हाला कोणती कार खरेदी करावयाची आहे ते तुम्हाला पहिल्यांदा ठरवावे लागेल.

योग्य डील शोधणे आवश्यक आहे.

तर आता तुम्हाला कोणती कार खरेदी करावयाची आहे हे तुमचे निश्चित झाल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या जवळपास असलेल्या जास्तीत जास्त डीलर्स ला भेट द्यायचे आहे. तुमच्या जवळील डीलर्स ला भेट दिल्यानंतर तुम्हाला काही अतिरिक्त वापर मिळतील. तसेच तुम्ही कार खरेदी करत असताना त्याची ऑन रोड किंमत सुद्धा तपासणी आवश्यक आहे.

यामध्ये कारची किंमत, रजिस्ट्रेशन फी, रोड टॅक्स, इन्शुरन्स तसेच डीलर्स ॲक्सेसरीज ची किंमत देखील ऑन रोड किमतीमध्ये जोडली जात असते त्यातील तुम्हाला काही नको असल्यास तुम्ही ते काढून टाकण्यात सुद्धा सांगू शकतात व नंतर योग्य किंमत विचारू शकतात.

कारची बुकिंग करणे

आपण आपल्यासाठी कार खरेदी करत असताना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार बुकिंग करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. तर यामध्ये तुम्हाला काही प्रमाणात सावधानता बाळगली पाहिजे. कार डीलर ने तुम्हाला कार मध्ये कॉम्प्लिमेंटरी म्हणून जे की देण्याचे आश्वासन दिलेले आहे ते तुम्ही तुमच्या बुकिंग पावतीवर नमूद करून घेणे अत्यंत आवश्यक असते. बुकिंग पावतीवर ते नमुद न केल्यास डीलर तुमच्या कारला डिलिव्हरीच्या वेळी तुमच्या कार मध्ये ते देण्यास नकार देऊ शकतो. तसेच तुम्ही यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट जसे की कारचे बुकिंग करत असताना बुकिंग रद्द करण्याची रक्कम देखील तपासून घ्यावी व तसा तुम्हाला दिलेल्या पावती वरती उल्लेख करावा.

जर तुम्हाला तुमच्या काही कारणामुळे तुमच्या कारचे बुकिंग रद्द करावे लागत असेल तर तुम्ही तुमच्या डीलरकडे बुकिंग केलेल्या रकमेतील किती रक्कम परत करणार आहे हे देखील तुम्हाला तुमच्या माहितीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

कार खरेदी करणे

जेव्हा तुम्ही खरेदी केलेली कार तुमच्या डीलरकडे पोहोचेल तेव्हा पूर्णपणे आपण ते तपासून घ्यावी म्हणजेच तुम्ही डिलिव्हरी आधीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमच्या कार मध्ये काही दोष किंवा डॅमेज पार्ट आलेले तर नाहीत ना ते तपासण्यासाठी देखील संधी तुम्हाला यामध्ये उपलब्ध असते.

जर का तुमचे कार एकदा रजिस्ट्रेशन साठी गेल्यास तिथे तुम्हाला काही बदल करता येणार नाही. पीडीआयच्या (PDI) प्रक्रियेमध्ये तुम्हाला वाहन नाकारण्याचा किंवा तुमचे बुकिंग रद्द करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तसेच डीलर तुमच्या परतावा देण्यात देखील बांधील आहे. तसेच तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी बाबत समाधानी नसल्या तुम्ही पॉलिसी काढणाऱ्याला तो बदलण्याची विनंती सुद्धा तुम्ही करू शकतात तसेच तुम्ही तुमचा इन्शुरन्स स्वतंत्रपणे देखील काढू शकतात.

कार डिलिव्हरी मिळण्याचा दिवस

तुमच्या कारची डिलिव्हरी ही एक प्रकारची वेळ घेणारे मोठी प्रक्रिया आहे. काही राज्यांमध्ये तुम्हाला तात्पुरता नंबर दिला जातो या नंबर वर वाहन चालवणे बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुमच्या राज्यातील तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक कायदे काय आहे त्याची तुम्ही माहिती घेणे आवश्यक आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काळजी डिलिव्हरी घेताना कंपनीकडून दिलेल्या सर्व पावत्या व इतर सर्व कागदपत्रे हे तुम्हाला मूळ स्वरूपात दिल्याची तुम्ही खात्री केली पाहिजे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment