Wednesday, September 27, 2023
HomenewsIncome Tax : 'या' 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची गरज नाही! ITR...

Income Tax : ‘या’ 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची गरज नाही! ITR भरण्याआधी जाणून घ्या ही माहिती

लोकल मराठी : आज प्रत्येक जण आपल्या उत्पन्नावर टॅक्स भरत आहे. तर प्रत्येकाने ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे की आपल्याला कोणत्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची गरज नाही. तर आज आपण या ब्लॉग पोस्टमध्ये 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागत नाही. तर या 6 प्रकारच्या उत्पन्नावर चर्चा करणार आहोत.

या 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची गरज नाही | Which income is not taxed?

जून जुलै महिना आला की प्रत्येकाची इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तयारी सुरू होते म्हणजेच प्रत्येकाला इन्कम टॅक्स भरण्याची घाई होत असते. या घाई मध्येच आपण सर्व काही विसरून आपण इन्कम टॅक्स भरून जातो पण आपण कोणत्या गोष्टींवर इन्कम टॅक्स भरला नाही पाहिजे ते आपण नक्कीच जाणून घेतले पाहिजे.

प्रत्येक सर्वसामान्यांसाठी इन्कम टॅक्स ही एक मोठी समस्या असते म्हणजेच आपण जेवढे कमवत असतो तेवढाच जास्त इन्कम टॅक्स आपल्याला भरावा लागतो या गोष्टीविषयी टॅक्स प्लेयर्स नेहमीच देवी देत असतात मात्र असे अनेक लोक आहेत की ज्यांना पूर्ण सत्य हे माहीतच नसते. (Six types of income which are tax free )

काही उत्पन्न असे असते की ज्यावर आपल्याला कोणताही इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. तुमच्या एकूण संपूर्ण उत्पन्नावर इन्कम टॅक्स साकारला जातो. यात फक्त सॅलरीचाच समावेश नसतो. सॅलरी व्यतिरिक्त तुम्हाला बचतीतून मिळणारे व्याज, घरातून होत असलेली कमाई, साईड बिजनेस, कॅपिटल अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला असतो.

विद्युत प्रवासाठी असलेले थ्री फेज व सिंगल फेज म्हणजे काय? पहा इथे

परंतु असे काही स्रोत आहेत ज्यातून मिळणारे उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाहीत. यामध्ये शेतातून मिळणारे उत्पन्न व्यतिरिक्त इतर अनेक उत्पन्न आहेत की जे कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेले आहेत. टॅक्स एक्सपर्टनुसार इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 10 मध्ये अशा करमुक्त उत्पन्नाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. ( Which income is tax-free in india )

कोणते उत्पन्न करमुक्त आहे.

1. शेतीतून मिळणारे उत्पन्न

आपला भारत देश हा भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. देशातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत सरकारने इन्कम टॅक्स कायदा 1961 मध्ये अमलात आणून शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकाराच्या कक्ष बाहेर ठेवण्यात आलेले आहे. तुमच्याकडे तुमची शेतजमीन असेल आणि तुम्ही शेती किंवा संबंधित कामातून कमाई करत असाल तर तुम्हाला या शेतीच्या उत्पन्नावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स/ कर भरावा लागत नाही.

2. बचत खात्यातील व्याज

तुम्हाला तुमच्या सेव्हींग अकाउंट वरील रकमेवर दर महिन्याला व्याज मिळत असते. आयकर कायद्यानुसार हे तुमचे एक प्रकारचे उत्पन्न आहे. पण यावर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80TTA नुसार आयकर कडून तुम्हाला सूट मिळू शकते. बचत खात्यावरील वार्षिक व्याज 10,000/- रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जास्तीच्या रकमेवरच आयकर भरावा लागत असतो. अन्यथा तुम्हाला आयकर भरावा लागत नाही.

3. स्कॉलरशिप अवार्ड

तुम्ही आता पहातच असाल की वेगवेगळ्या संस्था असतील किंवा कंपन्या ह्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप किंवा अवॉर्ड मिळवून देत असतात. त्यातून तो विद्यार्थी अभ्यासाचा सर्व खर्च चालवत असतो. तर त्याला या उत्पन्नावर आयकर कायद्याच्या कलम 10 (16) अंतर्गत इन्कम टॅक्स मधून सूट मिळत असते. यामध्ये कोणत्याही प्रकारची रकमेची मर्यादा नाही.

4. हिंदू अविभक्त कुटुंब कडून मिळालेली रक्कम (HuF)

हिंदू अविभक्त कुटुंबाकडून मिळालेले रक्कम किंवा वारसाच्या स्वरूपात मिळकत आहे. कराच्या कक्ष बाहेर ठेवण्यात आली आहे. अशा उत्पन्नाला आयकर कायद्याच्या कलम 10 (2) अंतर्गत करमुक्त ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, कुटुंबाचे उत्पन्न, स्थावर मालमत्तेचे उत्पन्न किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील उत्पन्नावर आयकर भरावा लागणार नाही.

5. ग्रॅच्युइटीवर ट्रॅक्स सूट

एखादा कर्मचारी किंवा व्यक्ती हा केंद्र किंवा राज्य सरकारसाठी काम करत असेल तर त्याला मिळणारी ग्रॅच्युइटी पूर्णपणे टॅक्स फ्री असते. मात्र खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जेव्हा एप्रिसीएशन टोकन मिळते, तेव्हा त्यासाठीचे टॅक्स नियम वेगळे असताना आपल्याला दिसून येत असतात.

यूट्यूब वरील व्हिडिओ डाउनलोड कसे करावेत पहा इथे

6. VRS वर मिळालेले रक्कम

इन्कम टॅक्स कायद्याच्या नियम 2BA अंतर्गत, VRS म्हणून पाच लाख रुपयांपर्यंत मिळालेली रक्कम ही करमुक्त असते.

ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपला लोकल मराठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. Join Whatsapp Group

होम पेज HOME PAGE
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments