What is the stock market? शेअर मार्केट म्हणजे काय
स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार ही अशा प्रकारची जागा आहे जिथे देशातील बऱ्याच कंपन्यांचे शेअर हे खरेदी विक्री केले जातात. शेअर मार्केट म्हणजेच ही अशा प्रकारची जागा आहे जिथे काही लोक एक तर बरेच पैसे कमवू शकतात नाही तर त्यांच्याजवळ असलेले सगळे पैसे यामध्ये गमावतात म्हणूनच काही लोक याला जुगारही म्हणतात. पण तसे अगदी नाही.
जर तुम्ही योग्य प्रकारचे मार्गदर्शन घेतले तर यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि शेअर मार्केट विषयी घेतलेली संपूर्ण माहिती यासोबतच तुमची रिस्क ओळखून शेअर बाजारात /Stock market गुंतवणूक दीर्घ काळासाठी केली तर याचा फायदा हा नक्कीच होत असतो.
जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर /Company shares खरेदी करणे म्हणजेच त्या कंपनीचे भागीदार होणे असते हा अनुभव वेगळ्याच प्रकारचा असतो. आपण एखाद्या कंपनीत किती जास्त रक्कम गुंतवत आहे त्यानुसार आपण त्या कंपनीचे काही टक्के भाग हे मालक होत असतो.
तुम्ही आजच्या काळात पाहतच असाल की जगात पैसे कमविण्याचे अनेक प्रकार आहेत. काही माणसे हे जॉब करून पैसे कमवत असतात, तर काही माणसे व्यापार म्हणजेच बिझनेस करून पैसे कमवत असतात आणि काही लोक असे असतात जे आपले पैसे दावावर लावून सुद्धा खूप पैसा / Money कमवत असतात.
शेअर बाजारात शेअर कधी विकत घ्यावे?
तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा शेअर विकत घ्यायच्या आधी आपण या विषयांमध्ये अनुभव असायला हवा की आपण कुठे व कधी investment केले पाहिजेत आणि कोणत्या कंपनी मध्ये आपले पैसे हे लावले पाहिजे व त्यानंतर आपल्याला याचा फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही त्या कंपनीचे शेअर विकत घेऊ शकता.
शेअर मार्केट / Share Market हे खूपच रिस्क म्हणजे धोकादायक आहे. म्हणूनच इथे तेव्हा गुंतवणूक केली पाहिजे जेव्हा तुमची आर्थिक परिस्थितीही चांगल्या प्रकारची असली पाहिजे. कारण तुम्हाला जरी तोटा झाला तरी तुम्हाला जास्त त्रास होणार नाही नाहीतर तुम्ही असं पण करू शकता की सुरुवातीला तुम्ही शेअर मार्केट मध्ये थोडेसे पैसे गुंतवू शकतात म्हणजे तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. जेव्हा या क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती आणि अनुभव मिळेल त्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकता.