Sant Tukaram beej information in Marathi तुकाराम बीज देहू येथील नांदुरकी वृक्ष आजही हालतो

Sant Tukaram beej information in Marathi: तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. 

संत तुकाराम हे इ.स. च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत – कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झालेला आहे.  पंढरपूरचा विठोबा हे संत तुकारामांचे आराध्य दैवत होते. संत तुकाराम वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखतात. संत तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत तुकाराम महाराज होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकाराम महाराजांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले आहे.

संत तुकाराम महाराज Sant Tukaram Maharaj bij सतत भावावस्थेत असल्याने देहात असूनही नसल्यासारखी असणे आणि म्हणून त्यांच्यात पूर्ण रुपये देवत्व असणे. 
संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प म्हणजेच जीवनातील नित्यकर्मे करणे एवढेच शिल्लक होते. बाकी सर्व काळ हरी नामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखी होते. पूर्ण रुपी देवत्व असेच असते.

Tukaram bij संत तुकाराम महाराज एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले असे होते. तीन भावांमध्ये तुकोबा हे मधले होते. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर प्रपंच व्यवस्थित झालेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या आई वडील गेले, त्यानंतर थोरल्याची बायको गेली, नंतर तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाई ही गेली, सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्याग करतात. येथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरीचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंग अनुभवातून शब्दबद्ध केले. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धोरणा होती. गरिबान विषयी त्यांना कळवळा होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top