रेल्वे विभागात नोकरी करणार् यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी रेल इंडिया टेक्निकल अँड इकोनॉमिक सर्व्हिस राइट्स ने विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे यासाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी येत्या 7 ऑगस्ट पर्यंत या पदासाठी अर्ज करू शकतात.

भारतीय रेल्वे विभाग भरती 2023 | Railway Recruitment 2023
उमेदवार rites.com या रेल्वे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी आपला अर्ज सादर करावयाचा आहे. अधिक माहिती जाणून घ्यायचे असल्यास देखील तुम्ही rites.com या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती मिळवू शकता.
रिक्त पदांविषयी माहिती
राइट्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सिव्हिल इंजीनियर, पर्यावरण सामाजिक निरीक्षण तज्ञ, जूनियर डिझाइनर, इंजीनियर ड्राफ्टस्मन आणि इतर पदांसाठी एकूण 111 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर असणार आहे. परंतु उत्तम कामगिरी दाखवल्यास उमेदवारांना मुदतवाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
पात्रता
- उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 40 वर्षांहून कमी असायला पाहिजे.
- आरक्षण असणारे उमेदवार यांना वयामध्ये विशेष सूट देण्यात आलेली आहेत.
- या पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांकडे मान्यताप्राप्त महाविद्यालयाची संबंधित क्षेत्रातील डिग्री असायला हवी.
- तसेच त्याच्याकडे चार पाच वर्षाचा अनुभव आणि पदाची माहिती असावी.
अर्ज भरण्याची प्रक्रिया
- या पदासाठी अर्ज भरणार् या उमेदवारांनी सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट वर जावे.
- त्यानंतर होम पेजवर करिअर टॅबवर क्लिक करावे.
- त्यानंतर करियर अंतर्गत ऑनलाइन नोंदणीकरन भागावर क्लिक करावे.
- यानंतर पायरी क्रमांक एक नोंदणीची लिंक भरावे आणि लॉगिन करावे.
- त्यानंतर पुढे Vac नंबर वर क्लिक करून समोर दिसणारे फॉर्म मध्ये आवश्यत ती संपूर्ण माहिती भरावी.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर तो फॉर्म सबमिट करा आणि त्याची एक प्रत आपल्याजवळ काढून ठेवावी त्याचा आपल्याला भविष्यात उपयोग होईल.