लोकल मराठी / localmarathi.in : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 मे 2023 रोजी विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती पण अखेर या भरतीला तात्पुरती स्थगिती कश्यामुळे पहा इथे संपुर्ण माहिती
Postponement of Maharashtra State Excise Department Recruitment – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रणाखाली लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान आणि वाहन चालक तसेच चपराशी या संवर्गातील सरळ सेवा रिक्त पदे भरणा करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.
या भरतीच्या प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे तसेच त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त असलेले पदे विचारात घेऊन एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रिया तात्पुरती स्वरूपात शासन निर्देशांमुळे स्थगिती देण्यात येत आहे असे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा :
तसेच ज्या उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी अर्ज भरलेले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. मात्र काही अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास उमेदवारांना सूचना देण्यात येतील. तसेच या भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे असं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे.
लोकल मराठी ई न्यूज पेपर व जॉब मिळवण्यासाठी लोकल मराठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. JOIN NOW