Pm Kisan ekyc there is good news for 12.53 crores related to PM Kisan Samman Nidhi Yojana now these farmer have been given till 31st May to do ekyc.
Pm Kisan ekyc: पी एम किसान सन्मान निधी योजनेची संबंधित 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे आणि आता या शेतकऱ्यांना pm kisan ekyc करण्यासाठी 31 मे पर्यंत वाढविण्यात आलेल्या आहे. तर पूर्वी केवायसी पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च होते त्यामुळे काही शेतकऱ्यांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात याचे वेळेवर एक केवायसी करू शकले नाही त्यामुळे त्यांचा दोन हजार रुपयांचा शेवटचा हप्ता थांबू शकतो. कृषी विभागाच्या माहितीनुसार आता ई-केवायसी 31 मे 2022 पर्यंत पूर्ण करता येईल त्यामुळे तुमचा हप्ता थांबू द्यायचा नसेल तर तात्काळ केवायसी करून घ्या.
ई केवायसी कशी करायची? How to do PM Kisan E KYC
सर्व शेतकऱ्यांनी सुरुवातीला खाली दिलेल्या लिंक वरून क्लिक करा.
तुम्ही पी एम किसान पोर्टल वर पोहोचल्यानंतर तिथे तुम्हाला उजव्या बाजूला किंवा खाली स्क्रोल केल्यानंतर ई-केवायसी लिहिलेले दिसेल त्यावर ती क्लिक करा.
सुरुवातीला त्या बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक टाकून सर्च बटणावर क्लिक करा.
त्यानंतर पुढे आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर चार अंकी ओटीपी येईल तो त्या ठिकाणी दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे.
त्यानंतर पुढे आधार प्रमाणीकरणासाठी बटन टेप करावे लागेल त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक आधार ओटीपी येईल जो सहा अंकांचा असेल तर पुढे दिलेल्या बॉक्स मध्ये टाका आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
नंतर तुमची ई केवायसी यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल.