शारदीय नवरात्री सणाचे महत्व,देवीची नऊ रूपे, नऊ माळा आणि बरेच काही पहा खाली संपूर्ण माहिती / Navratri 2021
![]() |
नवरात्री उत्सव २०२१ |
भारतामध्ये शारदीय नवरात्री उत्सव आला खूप महत्त्व आहे गणपती उत्सव संपला म्हणजेच नवरात्री उत्सव सुरू होतं मात्र पितृ पंधरवडा त्या तयारीत कधी संपतो हे आपल्याला कळत नाही. जागोजागी देवीच्या पूजेसाठी स्थापनेसाठी मंडप उभारणी असे कामे लगेच सुरू होतात. त्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते.
नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे प्रारंभी तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करतात.
हा सण नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा आहे पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार होत आलेले असतात काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप दररोज झेंडूच्या फुलांची माळ देवीपुढे सप्त शतीचा पाठ अशाप्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.
कधी सुरु होईल नवरात्री उत्सव / When will the navratri celebrations begin?
शारदीय नवरात्री उत्सव हा गुरुवार ९ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होत आहे.
देवीची नऊ रूपे कोणती / What are the nine forms of Goddess?
शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही देवीची नउ रूपे आहेत.
शारदीय नवरात्री सणाचे उत्सवाचे महत्व / Importance of navratri festival
शारदीय नवरात्रीचे महत्व आपल्याला देवीच्या विविध रूपांची आराधना करताना मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे. अशा प्रकारे लोकांच्या मनात होणारी म्हणून विकारांची भावना नष्ट करण्याच्या भावनेतून देवीची पूजा व चरणी विलीन होण्यासाठी घटस्थापना करण्यात येते नवरात्री उत्सवात कोणत्याही प्रकारचा ताण तणाव व्यक्तीच्या मनात किंवा डोक्यावर चेहर्यावर दिसून येत नाही त्यामुळे नवरात्रीच्या काळात आनंदी उत्साहाचे वातावरण निर्माण होण्यासाठी नवरात्री उत्सव महत्त्वाचा असतो.
शारदीय नवरात्री उत्सव साजरा का करतात / Why navratri is celebrated
नवरात्री उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याची परंपरा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते नवरात्री हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला सण आहे. नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी देवीची घटस्थापना झाल्यानंतर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवीची पूजा केली जाते. व टाळमृदुंगाच्या गजरात देवीच्या आरत्या म्हटल्या जातात तसेच वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हटली जातात. तसेच देवीच्या आरत्या म्हणण्यासाठी आपल्या गावातील गावकरी व मंडळी हे आपले स्वतःचे एक मंडळ स्थापित करत असतात. त्या ठिकाणी सर्व गावकरी देवीची पूजा करत असतात.
शारदीय नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा काही समाजात/गावोगावी असते. / Which are the nine garlands of navratri flowers
पहिली माळ
सेवंती आणि सोनचाफ्याचा सारख्या पिवळ्या फुलांची माळ असते.
दुसरी माळ
अनंत मोगरा चमेली किंवा तगर यांसारख्या पांढर्या फुलांची माळ .
तिसरी माळ
निळी फुले गोकरनिच्या किंवा कृष्णकमळ कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा.
चौथी माळ
केसरी अथवा भगवी फुले अबोली, तेरडा अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ
बेल किंवा कुंकवाची वाहतात.
सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ
झेंडू किंवा नारंगीचे फुले.
आठवी माळ
तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
नववी माळ
कुंकू मार्चन करतात.
या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.