PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही दिवसापासून म्हणजेच गेले चार दिवस हे अमेरिकेत दौऱ्यावर होते या ठिकाणीच अमेरिकेतील एका गायिकेने जन-गण-मन गायले. तर पंतप्रधान मोदींनी त्यांचे केले अभिवादन…

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची शुक्रवारी सांगता झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अमेरिकेतील सुप्रसिद्ध गायिका म्हणजेच मॅरी मिलबेन यांनी भारताच अमेरिकेत राष्ट्रगीत गायलं.
पंतप्रधान मोदींनी ( Modi ) त्यांच्या पाया पडून त्यांच्या गायनाचा अभिवादन केले तसेच पंतप्रधान मोदींसाठीच्या या कार्यक्रमात गायला मिळाले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे असे मेरी यांनी यावेळी म्हणाल्या या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अत्यंत मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
मॅरी मिलबेन या 38 वर्षाच्या गायिका आहेत. तसेच मेरी या गायिका भारतातही प्रसिद्ध आहे. त्यांनी गायलेले “ओम जय जगदीश हरे हे” गाणं अनेक भारतीयांना आवडलेला आहे. तसेच अनेक भारतीयांनी हे गाणे ऐकलेले सुद्धा आहे. मॅरी यांनी यावर्षी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमातही मॅरी यांनी सहभाग नोंदवला होता.
तसेच मॅरी मिलबेन ( Mary Milben ) यावेळी म्हणाले की पंतप्रधान मोदी आणि भारतीयांना मी माझे कुटुंब मानते तसेच त्यामुळे भारताचे राष्ट्रगीत गायला मिळाले ही माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. अमेरिका आणि भारताचे राष्ट्रगीते, लोकशाही आणि स्वातंत्र्याबद्दल भाष्य करत असतात. अमेरिका आणि भारताचे संबंधाचे हे एक मोठे सार आहे. तसेच एका स्वतंत्र देशाची ओळख येते ती स्वतंत्र असलेल्या लोकांमुळेच होत असते.
मोदींचा डंका संपूर्ण जगात
काही दिवसापूर्वीच पंतप्रधान मोदी जेव्हा न्यू गेणी या देशाच्या दौऱ्यावर गेले होते तसेच त्या ठिकाणी देखील पंतप्रधान जेम्स मारापे यांनी देखील त्यांचे आशीर्वाद घेतले होते. जेम्स यांनी पंतप्रधानांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडिया वरती व्हायरल झाला होता.