MPSC Exam :
कोरोनाच्या काळामध्ये शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनामुळे मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे त्यांची वयोमर्यादा मागील वर्षी संपत होती ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नव्हते.
सरकारने आणि आयोगाने अशा विद्यार्थ्यांना आणखीन एक वर्ष ही परीक्षा पुढे देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा नव्याने राबवावी लागणार आहे. मागील वर्षी शेवटची संधी असलेल्या विद्यार्थ्यांना या वर्षीच्या परीक्षा प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे दोन जानेवारीला होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे.
परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.