मोदी सरकारने आता केले लोकांचे जीवन सोपे एकाच पोर्टलवर होणार सर्व सरकारी कामे

पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या भाषणात देशातील सामान्य लोकांचे जीवनमान सुधारणे सरकारी अडथळे दूर करणे आणि सरकारशी संबंधित काम सोपे करणे याविषयी नेहमी बोलत असतात.

आता या दिशेने एक मोठे पाऊल उचलत सरकारने असे बॉटल सुरू केले आहे की जिथे तुमची जवळपास सर्व सरकारी कामे हे एकाच पोर्टलवर होणार आहेत. या पोर्टलवर तुम्हाला जवळपास 13000 हून अधिक सरकारी सेवा एकाच जागेवर मिळतील.

मोदी सरकारने नुकतेच राष्ट्रीय सहकारी सेवा पोर्टल सुरू केले आहे. सरकारशी संबंधित 13000 हून अधिक सेवा या पोर्टलवर एकत्रित केल्या गेले आहेत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या पोर्टलवर केवळ केंद्र सरकारच नाही तर राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक संस्था आणि जिल्हास्तरावरील सेवा देखील या पोर्टलवर समाविष्ट आहेत.

सरकारने services.india.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे. देशातील ऑनलाईन सरकारी सेवांची क्षमता सुधारण्यासोबतच पारदर्शकता आणण्याचे कामही करणार आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन बनवणे असो किंवा पॅन कार्ड किंवा कोणते सरकारी प्रमाणपत्र द्यावे लागत असेल हे सर्व कामे एकाच पोर्टलवर होणार आहेत. पुण्यात बसून इतर जिल्हा मुख्यालयातून किंवा तहसील मधून कोणतेही दस्तऐवज मिळवायचे असतील तर तुम्ही ते या पोर्टलवर घरी बसून आता एकदम सोप्या पद्धतीने आरामात करू शकतात.

या पोर्टलवर वित्त मंत्रालयाशी संबंधित 121 सेवा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाशी संबंधित 100 सेवा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित 72 सेवा धार्मिक आणि तक्रार निवारण मंत्रालयाशी संबंधित पेन्शन मंत्रालयाशी संबंधित साठ सेवा शिक्षण मंत्रालयाशी संबंधित 141 सेवांचे यामध्ये संकलन आहे.

अशा पद्धतीने या पोर्टल द्वारे 13350 सरकारी सेवांसाठी घरबसल्या काम केले जाईल यामध्ये तुम्हाला अल्पसंख्यांक मंत्रालयाशी संबंधित 39 आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित 38 सेवांचा यामध्ये समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top