महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे आता शस्त्र केल्यानंतर पुन्हा सक्रिय झालेले आहेत ते पुणे दौऱ्यावर गेल्यानंतर आज पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयातून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झालेली आहे.
यावेळी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले सदस्य म्हणून राज ठाकरे यांच्या नावाची नोंदणी करण्यात आलेली आली. यावेळी माध्यमांची बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे तसेच माझी नोंदणी केल्याबद्दल मी मनसेचे आभार मानतो असेही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा:
सदस्य नोंदणी केल्यानंतर पुढे काय होणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणीला आजपासून पुण्यामधून सुरुवात झालेली आहे. नोंदणी नंतर प्रत्येक सभासदाला मोबाईलवर पक्षाविषयी माहिती सुद्धा देण्यात येणार आहे तसेच राज ठाकरे यांचे भाषण, वक्तव्य सुद्धा तुम्हाला पाठविण्यात येणार आहेत.
राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत असे म्हटलेले आहे. तसेच निवडणूक आयोगानुसार दर तीन-चार वर्षांनी पक्षाला सदस्य नोंदणी हे करावी लागत असते यंदा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी होणार आहे. त्यामुळे आपणही लोकांपर्यंत जास्त वेळाने पोहोचायला हवे मनसे देखील लवकर सदस्य नोंदणी अभियान सुरू करत आहे.