राज्यात चार ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्याकडे शाळा सुरू करण्यास परवानगी मागितली होती त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची घंटा आता वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या? Education Minister Varsha Gaikwad
आधी कोरणामुक्त झालेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र टास्क फोर्ससोबत चर्चेनंतर आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
शाळा सुरू करण्याअगोदर आजारी मुलांना कसे शोधायचे. त्यांच्यासंदर्भात टास्क फोर्स ट्रेनिंग देणार आहे. यासोबत पालकांनी काय काळजी घ्यायची यासंदर्भातही आम्ही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.