INS vikrant: स्वदेशी बनावटीची सुसज्ज युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताब्यात दाखल झालेले आहे.
आता इथून पुढे कळेल संपूर्ण जगाला भारताची ताकद काय आहे ती कारण विक्रांत ही केवळ युद्ध नौका नसून एकविसाव्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रमाचा अनेक कौशल्याचा हा एक प्रकारचा पुरावा आहे.Indigenous warships
सकाळी 09:00 वाजता मोदी कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये दाखल झाले येथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन उपस्थित होते. मोदींनी विमानवाहू नौका तयार करणाऱ्या अभियंत्यांचे कौतुक केले ते म्हणाले या जहाजात जितक्या केबल्स आणि वायर्स आहेत त्या कोची पासून काशीपर्यंत पोहोचू शकतात. आयएनएस विक्रांत ही केवळ युद्ध नौका नसून समुद्रात तरंगणारे शहर आहे. Vikrant Ship
त्यानंतर मोदी पुढे म्हणाले की आता हा एक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. हे भारताच्या प्रतिभेचे उदाहरण सुद्धा आहे. सशक्त भारताचे शक्तिशाली चित्र सुद्धा आहे. हे अमृत महोत्सवाचे अतुलनीय अमृत आहे. हे दाखवून देते की जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा निश्चय केला तर काहीही अशक्य नाही. आज आपण एका नव्या सूर्याचा उदय या ठिकाणी पाहत आहोत.
विक्रांतच्या बांधकामासाठी लागणारे युद्धनौकेचे स्तरावरील स्टील भारतीय पोलाद प्राधिकरणाने तयार केलेले होते हे पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेची मदतही या ठिकाणी विक्रांतची शिप तयार करण्यासाठी मदत घेण्यात आलेली होते.
आता विक्रांत मुळे चीनवर सहज मात करणे सुद्धा शक्य
विक्रांतच्या समावेशामुळे नौदलाच्या ताकदित मोलाची भर पडलेले आहे आणि देशाच्या तिन्ही बाजूला असलेल्या अथांग समुद्रावर वर्चस्व ठेवण्यात भविष्यात आयएनएस विक्रांत हे एक मोलाची कामगिरी सुद्धा करेल विशेषतः भारताजवळील सागरी क्षेत्रात चीनच्या नौदलाच्या वाढत्या हालचालींना शह देण्याचे काम हे आता विक्रांतच्या माध्यमातून आणखी आक्रमकपणे करणे नौदलाला शक्य होणार आहे.
nice