Maharashtra HSC 12th result 2021 date : 30 तारखेला CBSE चा निकाल जाहीर झालेला आहे. आणि एकीकडे महाराष्ट्र राज्य व माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या 12th च्या विद्यार्थ्यांना व पालकांना निकालाची उत्सुकता निर्माण झालेली आहे.
12 वी ( HSC ) निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बोर्डाचा निकाल हा उशिरा लागण्याची माहिती मिळत आहे.12वी चा निकाल हा जुलै अखेरीस लागण्याची शक्यता होते परंतु राज्यात बऱ्याच ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाल्यामुळे बोर्डाचे काम हे अपुरे राहिल्यामुळे निकाल हा ऑगस्ट महिन्यात लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल हा 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा फॉर्म चालू झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना HSC निकालाची उत्सुकता निर्माण झालेली आहे. मात्र HSC शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार ते पाच दिवस वाढवून द्यावेत. अशी मागणी शिक्षण संघटनांनी 21 जुलै शालेय शिक्षण मंत्र्याकडे केली होती.
हेही वाचा : बारावीचा निकाल कसा पहायचा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल कसा लावणार आहे.
इयत्ता 10 वी गुणांच्या 30% भारांश
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ज्या तीन विषयांना जास्त गुण आहेत. त्या तीन विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
इयत्ता 11 वी गुणांच्या 30% भारांश
इयत्ता अकरावीच्या वार्षिक परीक्षेच्या विषयनिहाय गुण धरले जाणार आहेत.
इयत्ता बारावीच्या ( HSC ) 40% भारांश धरला जाणार आहे.
इयत्ता बारावीच्या 40% भारांश निश्चित धरण्यात आलेला आहे. यामध्ये प्रथम सत्र परिक्षा, सराव परीक्षा, आणि सराव चाचण्या यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत.
बारावीचा (HSC) निकाल पहा इथे क्लिक करा.
इथे पण पाहू शकता बारावीचा निकाल Click here