डीजीटल सातबारा ( ७/१२ ) मोबाईलवर कसा काढायचा
आजच्या काळात सर्व काही डिजिटल झाले आहे त्यामुळे शासनाने नवीन प्रकारे एक डिजिटल सातबारा साईट तयार करून त्यावरती सातबारा उपलब्ध केलेला आहे. व तुम्हला आता तलाठ्याकडे जाण्याची गरज पडणार नाही व कुठेही रांगेत उभा राहण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या डिजिटल सातबारा काढू शकता तोही अगदी सहज रित्या तोही आपल्या मोबाईलवर काढू शकता.
संगणकिकृत डिजिटल स्वाक्षरीत असणारा ७/१२ देणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात पहिले राज्य आहे. जवळजवळ आतापर्यंत सर्वच सातबारे हे Digital स्वाक्षरीत तयार झालेले आहेत. महसूल विभागाने डिजिटल स्वाक्षरी युक्त सातबाराचे लोकार्पण सोहळा हा फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे.
सातबारा हा जास्त प्रमाणात शासकीय कामासाठी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना फार अडचणी येत होत्या. आणि तो एका विभागाकडून दुसऱ्या भागाकडे जावे लागत होते त सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना फिरावे लागत होते. या अशा अनेक कारणांमुळे DIGITAL 7/12 उतारा तयार करण्यात आलेला आहे.
तुम्हाला DIGITAL स्वाक्षरीचा ७/१२ मिळवण्यासाठी खालील लिंक वर जा / संकेतस्थळावर जावे.
https://mahabhulekh.maharashtra.gov.in/
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/
यामध्ये महत्वाचे म्हणजे तुम्ही एक स्वतःचे अकाउंट ओपन करून घ्या त्यानंतर तुम्ही सर्व प्रोसेस करू शकता.
तेथे तुम्ही जिल्हा तालुका गाव आणि सर्वे नंबर गट नंबर अशी सर्व माहिती भरावी. त्यानंतर डाउनलोड बटणावर क्लिक केल्यानंतर पीडीएफ स्वरूपात हा तुमचा digital 7/12 डाउनलोड झालेला दिसेल त्यानंतर तुम्ही तो प्रिंट काढून वापरू शकता. हा प्रिंट काढलेला सातबारा तुम्ही सर्व शासकीय कामासाठी वापरू शकता व त्यावर तुम्हाला कोणत्याही व कोणाची स्वाक्षरी घेण्याची गरज नाही तो तुम्ही कुठेही वापरू शकता.