Gudi padwa information in Marathi : गुढीपाडवा सणाची माहिती मराठी इतिहास आणि महत्त्व
![]() |
Gudi padwa images |
गुढीपाडवा Gudi padwa हा सण हिंदूंचा आहे याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली होते पुराना प्रमाणे ब्रह्मादेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते.
हेही वाचा- गुढी पाडवा शुभेच्छा संदेश मराठी
गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राच्या सत्ता असलेल्या राज्यात स्वतंत्र प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजय दिन म्हणून सवंत्सर पाडव, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रमुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा Gudipadva Information Marathi असे म्हणले जाते. शालीवाहन संवत्सराचा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवीन उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. उभारलेल्या गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढीपाडव्या पासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होत असतो.
गुढी का उभारतात माहित आहे का पहा इथे Why Gudi is raised
भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची एक परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात साजरा करत असतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूंची काठी त्यावर रेशमी वस्त्र कडुलिंबाची डहाळी. आंब्याची पाने. सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे तांब्या बसून गुढी उभारली जाते ही गुढी स्नेहाचे मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानलेले आहे. ती विजयाचा संख्येतही देत असते.