गांधी जयंती ( Gandhi Jayanti 2021 ) हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला आहे. 2 ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस बापूंचे विचार आणि मार्गदर्शक तत्त्व आजही आपल्यासाठी तितकेच ते प्रेरणादायी ठरते. भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून सोडवण्यासाठी बापूंनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. अर्थात त्या काळीही जहालमतवादी स्वातंत्र्य सैनिकांचा मार्ग बाजूला सारून बापूंनी शांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य आंदोलन सुरूच ठेवलं. बापूंनी जगाला दिलेला सत्य आणि अहिंसेचा मार्ग आजच्या काळातही तितकाच सुसंगत ठरतो.
तुमच्या कुटुंबियांना मित्रमंडळींना या दिवसाच्या शुभेच्छा तुम्हालाही नक्कीच द्यायच्या असतील तुमच्या विचाराशिवाय यासाठी आणखी प्रेरणादायी ठरू शकत.
रघुपती राघव राजारामपतित पावन सीतारामसीताराम सीतारामभज प्यारे तु सीताराम
ईश्वर अल्लाह तेरे नामसबको सन्मती दे भगवानगांधी जयंतीच्या शुभेच्छा!
खादी माझी शान,कर्मच माझी पूजाखरेपणा माझा कर्मआणि हिंदुस्तान माझा जीव आहेगांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!