Monday, October 2, 2023
HomeUncategorizedFunny jokes : म्हणून मी नेहमी आनंदी असतो

Funny jokes : म्हणून मी नेहमी आनंदी असतो

म्हणून मी नेहमी आनंद असतो

 

मी भूतकाळ चघळत नाही 
ना मी भविष्यकाळाची चिंता करतो 
मी वर्तमानात जगतो 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

मी कुणाकडून काडीची अपेक्षा करत नाही 
मी कोणाबद्दल राग मनात धरत नाही 
मी लगेच सगळ्यांना माफ करतो 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

मी हाय फाय राहण्यासाठी धडपडत नाही
आपुलकीचे आणि मैत्रीची किंमत नसणाऱ्या साठी कधीच दुःखाने तडफडत नाही 
साध राहून माझ्या माणसात सुखान रमतो 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 

कोण काय बोलतोय याचा मी कधीचं विचार करत नाही 
कोणी काही बोललं तरी 
पुन्हा मी ते स्मरत नाही 
माझ्या जीवनात स्वच्छंदी आहे 

ते मी मजेत जगतो 
म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

मला ना पदाचा ना ज्ञानाचा अहंकार 
कधी मला तुच्छतेचा विचार 
कधी मनाला नाही भावला पाय जमिनीवर ठेउन प्रसंगी अनवाणी चालतो 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. 

जगायला काहीच भौतिक सुख लागत नाही
म्हणून मी गर्वाने कधीच वागत नाही 
सगळ्यांशी प्रेमाने आदराने 
आपुलकीने वागतो 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

जन्म श्वासत आहे तसा मृत्यू देखील श्वासत आहे ही जाणीव आहे 
माझ्यातही दोष आहेत आणि 
काहीतरी नक्कीच उणीव आहे 
माझे दोष मी रोजच पाहून 
सुधारण्याचा प्रयत्न करतो 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments