EPF पासबुक डाऊनलोड करता येत नाही तर जाणून घ्या सोपी पद्धत

तुम्ही इंटरनेटवरून एकदम सोप्या पद्धतीने EPF पासबुक डाऊनलोड करू शकतात. इंटरनेटवरून EPF पासबुक डाऊनलोड करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. EPF पासबुक डाऊनलोड करण्याच्या प्रक्रिये बाबत सविस्तर जाणून घ्या माहिती

कसे कराल डाउनलोड EPF पासबुक How to download EPF passbook

  • सर्वप्रथम तुम्हाला EPF च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यानंतर तुम्हाला UAN या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमच्या आवश्यक डिटेल्स टाकावे लागतील.
  • नंतर ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर Get Authorization Pin या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
  • ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्ही टाकलेल्या तपशिलांची तुम्हाला पडताळणी करावी लागेल.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक OTP पाठवला जाईल तो OTP बॉक्समध्ये टाकल्यानंतर तुम्हाला Validate OTP and activate हा पर्याय निवडावा लागेल.
  • तुमचा UAN सक्रिय झाल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर पासवर्ड सह एक मेसेज येईल.
  • हा पासवर्ड वापरून तुम्ही तुमच्या खात्यात लॉगिन करू शकता.
  • नंतर UAN सक्रिय झाल्यानंतर सुमारे सहा तासानंतर तुम्ही तुमचे स्टेटमेंट पाहू शकतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment