ठिबक सिंचन माहिती मराठी Drip irrigation information marathi

Drip Irrigation Information Marathi : ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानसा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याच्या आधुनिक पद्धत ही वापरताना जमिनीचा दर्जा पिकांची जात पिकांचे स्वरुप बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या गरजेनुसार पॉलीथिनच्या नळ्यांचे जाळे पसरतात ठिबक सिंचन चा शोध इस्राइलमधील तज्ञ सिमचा ब्लास यांनी लावला.
या पद्धतीत जमिनीत पाणी जिरवण्याचा जो वेग असतो तो मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वेकरुन पाणी थेंबाथेंबाने अथवा सूक्ष्म धारेने दिले जाते. ते ठिबक सिंचन Drip irrigation information पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी जमीनीच्या निरनिराळ्या प्रकारच्या जलधारणशक्ती वापसा तसेच पाणी शिरण्याचा व जमिनीच्या पोकळीतून वाहण्याचा वेग इत्यादी. भौतिक गुणधर्म यांचा अभ्यास करने आवश्यक असते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून भारतात 60%  ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले.

Drip irrigation meaning in marathi

ठिबक सिंचन हे जास्त प्रमाणात हे बागांमध्ये वापरले जाते व थोड्या फार प्रमाणात पिकांसाठी सुद्धा वापरले जाते.
ठिबक सिंचनामुळे Drip irrigation पिकाच्या उत्पादन सरासरी 20 ते 30 टक्के वाढ होते. शिवाय वेळेवर व योग्य पाणी मिळाल्यामुळे पिकांचा दर्जा वाढतो. ठिबकमधून विद्राव्य खते पिकांना देता येतात. परिणामी खतांची मुबलक मात्रा बसून पिक जोरदार येते. पिकांचा पक्क होण्याचा कालावधी कमी होऊन कमी कालावधीत पीक तयार होते व काढता येते. पारंपरिक पद्धतीने पाणी द्यायचे ठरल्यास जमिनीचे सपाटीकरण करावी लागते. कारण त्याशिवाय दंडातून पाणी पीका पर्यंत पोहोचत नाही. मात्र ठिबकमुळे जमीन सपाट करण्याची गरज पडत नाही. म्हणजे हा सर्व खर्च वाचतो चढ उताराच्या जमिनीवर फळ झाडे लावता येऊ शकतात.

ठिबक सिंचन माहिती / Drip irrigation information marathi

ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपण सिंचन रोपाच्या मुळापाशी पाणी पडेल या पद्धतीने करतो. यासाठी चार ते सहा मीटर उंचीवर साठवलेले पाणी उपकरणास पुरविले जाते व त्यातून त्या शेतीवर उगवलेल्या रोपाच्या मुळाशी सछिद्र रबरी पाइपद्वारे थेंबामागुन थेंब या पद्धतीने पुरविण्यात येते. यामुळे पिकाच्या वाढीसाठी लागणारे पाणी तर पुरविले जातील परंतु सर्व जमीन ओली करून पिकांना पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये जो बाष्पीभवनाने आणि पाझरामुळे त्यामुळे पाण्याचा नाश होतो तो होत नाही. परंतु ठिबक सिंचन Drip irrigation पद्धतीवर असा आक्षेप घेतला जातो की त्यासाठी पंप उंचावर पाणी साठविण्यासाठी टाकी उपकरण (ट्रीप सेट) आणि पाइपची जाळ्याचा अधिकचा खर्च करावा लागतो. शिवाय पंप चालविण्यासाठी वीज किंवा डिझेलचा खर्च येतो. तो वेगळाच मात्र गुरुत्वाधारित ठिबक सिंचन पद्धतीत पंप उंचावर असणारी पाण्याची टाकीही या बाबींवर येणारा खर्च करण्याची आवश्यकता नाही.

ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे Advantages of drip irrigation system

 • पाण्याची बचत व पाण्याचा कार्यक्षमरीत्या वापर
 • पिकाची उत्पादकता व गुणवत्तेत वाढ
 • खतांचा कार्यक्षम रित्या वापर
 • आंतरमशागतीवरील खर्च कमी
 • क्षारयुक्त पाण्याचा वापर
 • पीक पक्वतेच्या कालावधीत घट
 • जमिनीचे धूप थांबते.
 • पाणी साठवून राहत नाही.
 • जमिनी खराब होत नाही.
 • चिंतामुक्त शेतीसाठी ठिबक सिंचन वरदानच म्हटले पाहिजे.
 • दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते.
 • कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.
 • पिके लवकर काढणीला येतात त्यामुळे दुबारा पिकाला फायद्याचे ठरते.
 • पाणी देण्यासाठी रानबांधणीची गरज नसते. त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते.
Drip Irrigation Information Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment