गुढीपाडवा हा भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. या महा पर्वाच्या अर्थात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण सर्व बांधव गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो. या दिवशी आपल्या अंगणात ही गुढी सुद्धा आपण उभारत असतो.
![]() |
gudi padwa images |
गुढी म्हणजे उंच बांबूची काठी आणि त्यावर लावलेले रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि काही साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे तांब्या बसवून ही गुढी उभा करत असतात.
हेही पाहा: ब्लॉग लिहून पैसे कसे कमवतात
या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते आणि तो हा विजय उत्सवाचा दिवस घरातून वालीचा, असुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहेत असे म्हणतात.
याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवासही संपलेला होता म्हणून हा आनंदाचा दिवस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस मानला जातो. भगवान विष्णूंनी मत्स्य स्वरूप धारण करून त्याचा वध केला त्या मत्सरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच.
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला आणि मग या सेन यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला.