Diwali 2021 Date : कधी आहे दिवाळी जाणून घ्या पूजा मुहूर्त व्रत आणि नैवद्य

हिंदू धर्मात दिवाळी (Diwali 2021) या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार दिवाळी किंवा दीपावली कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. म्हणजेच दिवाळी साजरी केली जाते. या वर्षी कार्तिक अमावस्या 4 नोव्हेंबर गुरुवार रोजी (Diwali Date) आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी (Mata Lakshmi) आणि श्री गणेशाची पूजा (Shri Ganesha) केली जाते. दिवाळीला लक्ष्मीची पूजा केल्यास सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते असे मानले जाते. तसेच जीवनात आर्थिक भरभराट येते असे देखील मानले जाते.

दिवाळी साठी लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त कोणता Lakshmi pujan Muhurat 2021

अमावस्या तिथी 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 06:03 पासून सुरू होईल आणि 05 नोव्हेंबर रोजी पहाटे 02:44 वाजता संपेल. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा संध्याकाळी 06:09 ते रात्री 08:20 पर्यंत आहे. पूजेचा कालावधी 01 तास 55 मिनिटे असा आहे. तरी सर्वांनी या कालावधीत दिवाळीचे Diwali 2021 लक्ष्मीपूजन करून घ्यावे.

अशी करा पूजा

  • सर्वप्रथम पूजेचा संकल्प करा.
  • श्री गणेश, माता लक्ष्मी, सरस्वती यांच्या सह कुबेराची पूजा करा.
  • ओम श्री श्री हून नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 01 माळ जप करा.
  • पूजेच्या ठिकाणी एकच नारळ ठेवा 
  • श्री यंत्राची पूजा करा आणि उत्तर दिशेला स्थापित करा. देवी सूक्तमचे पठण करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment