Digi locker on WhatsApp | आता व्हाट्सअप वर डिजि-लॉकर; कागदपत्रे ठेवा अधिक सुरक्षित एकदम सोप्या पद्धतीने

Digi locker on WhatsApp: आता तुम्ही तुमच्या व्हाट्सअप वर डीजे लॉकर मध्ये कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता ते कशा पद्धतीने पहा इथे

तुम्हाला तर माहीतच आहे की व्हाट्सअप हे जवळपास सर्वजण वापरत आहेत. सगळ्यात आधी मोबाईल घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा व्हाट्सअप डाउनलोड करत असतात. आता नागरिकांसाठी व्हाट्सअप मध्येच हेल्प डेस्क च्या माध्यमातून डिजिलॉकर ही सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या अंतर्गत तुम्ही डीजी लॉकर खात्याचे प्रमानी करण करून पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्रे डाऊनलोड करणे यांसारख्या सेवा तुम्हाला अगदी आपल्या व्हाट्सअप वर उपलब्ध होत आहेत.
My Gov हेल्प डेस्क चा लाभ कसा घ्याल? व्हाट्सअप वापर करते चॅट बॉक्सवर नमस्ते, हाय किंवा डीजी लॉकर असा मेसेज +919013151515 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता.
या हेल्प डेस्कच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व प्रकारची कागदपत्रे एकदम सुरक्षित ठेवू शकता तसेच याचे 2022 मध्ये उद्घाटन झाल्यापासून व्हाट्सअप वरील माय जीओव्ही हेल्प डेस्कने नागरिकांना कोरूना बाबतचे विश्वासार्ह माहिती लसीकरण नोंदणी आणि लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करणे यासह अन्य सुविधा यावर उपलब्ध करून दिल्या आहेत.
प्रामुख्याने हे डिजिलॉकर आतापर्यंत दहा कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी नोंदणी केलेले आहेत तर पाच अब्ज पेक्षा जास्त कागदपत्रे वितरित करण्यात आलेले आहेत. व्हाट्सअप वरील ही सेवा विश्वासार्ह माहिती व्हाट्सअप वरील कागदपत्रे मोबाईल फोनच्या माध्यमातून उपलब्ध करून नागरिकांना डिजीटल दृष्ट्या सक्षम बनवेल यात काहीच शंका नाही.

Leave a Comment