राज्यामध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे तसेच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक योजना आणलेली आहे. (Government scheme for farmers) या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे नियमितपणे आपल्या (crop loan repayment) पीक कर्जाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
ही योजना कोरोनाच्या काळात सुरू झालेले असून पण कोरोनाच्या काळामध्ये या योजनेला स्थगिती मिळालेली होती परंतु आता या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप करून दिले जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आता अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला असेल की प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान कधी व कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल तर अधिवेशनामध्ये विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे अर्थमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यामध्ये जवळपास वीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
कोण कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.