लोकल मराठी: आजच्या काळात प्रत्येक गोष्ट ही डिजिटल होत चाललेले आहे आणि डिजिटल युगाकडे ( Digital India ) वाटचाल करीत भारताने एक नवी क्रांती घडून आणलेली आहे. विशेषतः आपण जेव्हा डिजिटल पेमेंट ( Digital Payment )बद्दल चर्चा करत होतो तेव्हा आपल्याला लोकांनी या नव्या डिजिटल प्रणालीचा वापर करणे स्वीकारल्याचं पाहायला मिळतं.

कोरोनाच्या काळात नंतर मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या डिजिटल पेमेंट बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्येच एक म्हणजे QR Code आपण प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. तरी What is QR Code? तर आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
सध्याच्या काळात संपूर्ण जगभरात जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये आपल्या भारतीयांचा मोठ्या प्रमाणात योगदान असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा :
- या 6 प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्स द्यायची गरज नाही
- विद्युत प्रवाहसाठी असलेले थ्री फेज व सिंगल फेज म्हणजे काय?
QR Code Information : पण या भारतातील डिजिटल क्रांतीमध्ये आपल्या भारतातील काही इंजिनियर्सचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. कारण त्यांनी अशा काही प्रकारचे ॲप्स तयार केलेले आहेत की ज्यामुळे डिजिटल पेमेंट करणे हे आपल्यासाठी अत्यंत सोपे आणि सुलभ तयार केलेले आहे. यापैकीच एक म्हणजे QR Code किंवा कोड स्कॅन करून तुम्ही हवे तेवढे पैसे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपण एकदम सोप्या पद्धतीने पाठवू शकतो. याच क्यूआर कोड च्या माध्यमातून दररोज लाखो लोक पैशांचा व्यवहार करत आहेत. आपण पाहत आहोत की, आपल्या भाजी मार्केट वाल्यापासून ते मोठमोठ्या मॉलमध्ये QR Code चा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. तर हा क्यू आर कोड आहे तरी काय? तर हेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
क्यू आर कोड म्हणजे काय? What is QR Code
क्यू आर कोड चा फुल ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ हा एक मशीन रिडेबल लेबल सारखा असतो. जो संगणकाला इतर कोणत्याही मजकुरा पेक्षा लवकर आणि सहज समजत असते. आजकाल सर्व म्हणजे अनेक ठिकाणी क्यू आर कोड वापरलेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः प्रोडक्ट ट्रॅक करण्यासाठी त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केलाजातो. तसेच जाहिराती बिलबोर्ड किंवा बिझनेस विंडोमध्ये या कोडचा वापर आजच्या काळात मोठ्या प्रमाणात केल्याचे आपल्याला पाहायला मिळून येते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2D बारकोड हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा QR Code ठरलेला आहे. याचाच वापर काही काळापूर्वी प्रॉडक्टचा डेटा स्टोअर करण्यासाठी वापरला जात होता. परंतु QR कोड डेटा स्टोअर करण्यासाठी एन्कोडींग मोडचा वापर केला जातो.
QR कोड काम कसा करतो? How QR Code Works
तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या मोठ्या दुकानांमध्ये किंवा कपड्याच्या दुकानांमध्ये बारकोड पाहिला असेल तो जो बारकोड ज्या प्रकारे काम करतो त्याच प्रकारे हा QR Code देखील काम करत असतो. परंतु ते दिसायला एकमेकांपेक्षा बरेचसे वेगळे असतात. या क्यू आर कोड मध्ये बारकोड सारख्या रेषा नसतात. तर यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डॉट्स असतात. हा कोड हा दोन प्रकारचा असतो. पहिला स्टॅटीक आणि दुसरा डायनॅमिक. स्टॅटीक QR कोड हा एक प्रकारे स्थिर असतो. म्हणजेच एकदा तो जनरेट केला तर तो पुन्हा बदलता येत नाही. तर दुसरा डायनॅमिक QR कोड गतिशील असतो. म्हणजेच त्यामधील माहिती पुन्हा-पुन्हा अपडेट करता येऊ शकते. ( QR Code Generator )
होम पेज | HOME PAGE |