Chakli recipe in Marathi चकली रेसिपी मराठी

Chakli recipe in marathi चकली रेसिपी 

चकली रेसिपी मराठी दिवाळीमध्ये चकली ही प्रत्येकाच्या घरोघरी बनवली जाते काही लोकांना घरी चकली बनवण्यास अडचण येते व खूप अवघड जाते पण आज आपण आपल्या घरी चकली रेसिपी बनवायला शिकणार आहोत.

चकली एक चवदार नाश्त्याची एक प्रकार आहे भारतात चकली ही खूप लोकप्रिय आहे दिवाळीच्या वेळी अनेकांच्या घरी बनवली जाते.

चकली बनवण्यासाठी साहित्य Ingredients for making chakli 

  • 3 भाजणी वाट्या 
  • मोठे 3 चमचे तेल 
  • तिखट 3 चमचे 
  • 3 मीठ चमचे
  • तीळ पाव वाटी
  •  तळणीसाठी तेल

चला तर मग बघू काय आहे चकली बनवण्यासाठी ची कृती The recipe for making chakli

पुरण
1) प्रथम अडीच वाट्या पाणी तापत ठेवावे त्यामध्ये तेल, तिखट, मीठ घालावे.
2) पाणी उकळू लागल्यावर खाली उतरावे.
3) त्यानंतर तीन वाट्या भाजणी व पाव वाटी तेल घालून उलथन्याने सारखी करावी.
4) मळून घ्यावी 
5) कोरडे वाटल्यास कोमट पाण्याचा हबका द्यावा. पीठ चांगले मळावे.
6) चकली पात्राने प्रथम कागदावर चकल्या पाडाव्यात.
7) तेल कढईत तापत ठेवावे. 
8) तेल चांगले कडकडीत तापल्यावर मध्यम गॅस करावा.
9) कागदावर घातलेल्या चकल्या कढईत सोडाव्यात चकल्या वर झाऱ्याने तेल उडवावे. 
10) गुलाबी रंग आल्यावर उलट्या बाजूने तळाव्यात.
11) गार झालेली चकली हाताने मोडून पहावे. मऊ वाटल्यास थोडी जास्त तळून काढावी.
12) दिवाळीच्या वेळेस साधारण शेव केल्यानंतर त्याच तेलात लगेच चकल्या तळाव्यात कारण शेवेस तेल जास्त लागते.
हेही पहा :
Chakli Recipe Marathi चकली रेसिपी मराठी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment