BSF Recruitment 2023: 12 वी आणि ITI झालेल्या उमेदवारांसाठी BSF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

BSF Recruitment 2023: जे विद्यार्थी तसेच तरुण नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासाठी खास करून एक मोठी आनंदाची बातमी आहे.

विशेषता ज्यांना सीमा सुरक्षा दलात नोकरी करावयाची असेल अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे. कारण की BSF Recruitment 2023 विविध रिक्त पदांसाठी नुकतीच एक भरती आयोजित केलेली आहे. यासाठी अधिसूचना म्हणजे जाहिरात देखील BSF च्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे. या अधिसूचनेद्वारे बीएसएफ मध्ये विविध रिक्त पदांच्या जवळपास 287 जागा भरल्या जाणार आहेत.

कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?

बीएसएफने/BSF जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हेडकॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदांच्या रिक्त जागा या जाहिरातीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

पदानुसार रिक्त जागांची संख्या किती?

  • हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर एकूण जागा – 217
  • हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक एकूण जागा – 30

शैक्षणिक पात्रता

जाहिरातीत नमूद केलेल्या माहितीनुसार या पदासाठी विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या तीन विषयासह बारावी उत्तीर्ण उमेदवारच यासाठी पात्र राहणार आहे. सोबतच सदर उमेदवारांनी आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.

या पदासाठी किती पगार मिळणार

या दोन BSF Recruitment 2023 बीएसएफ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 25000 ते 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

या पदांसाठी अर्ज कसा करावयाचा.

या पदांसाठी जे इच्छुक उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावयाचा आहे. तरी https://bsf.gov.in/ या लिंक वर जाऊन पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.

अधीसूचना पहा

तरी सर्व उमेदवारांना जाहिरात पाहिल्याशिवाय आपण कोणत्याही पद्धतीचा अर्ज करावयाचा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या Download Now बटणावरती क्लिक करून जाहिरात डाऊनलोड करून आपण आपला अर्ज सादर करावयाचा आहे.

जाहिरात पहा Download Now
अधिकृत संकेतस्थळ https://bsf.gov.in/
जॉब माहिती मिळविण्यासाठी जॉइन करा Join Now WhatsApp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top