BJP PM Modi : मुंबईतील कट्ट्यांवर रंगणार आता मोदींच्या कामांच्या गप्पा

PM Modi : मुंबईतील कट्ट्यांवर रंगणार प्रधानमंत्री च्या कामांच्या गप्पा पाच संपूर्ण बातमी काय आहे नेमके…

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा आणि मुंबई मनपा या दोन इलेक्शन लवकरच येणार आहे तर या लोकसभा आणि मुंबई मनपा जिंकण्यासाठी हा भाजपाचा नवीन डाव

यामध्ये मोदींनी ( Prime Minister Narendra Modi) केलेली सर्व केंद्राची कामे ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा भाजपाने फंडा केलेलं जाणून येत आहे. यामध्ये भाजपाचे उमेदवार, कार्यकर्ते हे जनते पर्यंत जाऊन कार्य करण्याचे दिसून येत आहे.

Mumbai Katta : यामध्ये आशिष शेलार यांची ही संकल्पना असल्याचे हे दिसून येत आहे. तर आता मुंबईतील कट्ट्यांवर आता रंगणार या मोदींच्या कामांच्या गप्पा. मुंबईत वेगवेगळ्या नाक्यावर किंवा वेगवेगळ्या कट्ट्यांवर ही माहिती पोहोचवण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे काम करणार आहेत.

BJP: भाजपाचे वेगवेगळे युवा मोर्चा, महिला मोर्चा अशा एकूण 48 मोर्च्यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने 500 माणसांपर्यंत ही केंद्राची सर्व कामे पोहोचवण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात येत आहे.

तसेच यामध्ये ज्या शासनाच्या योजना ( Government Scheme ) आहेत. त्या जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत अशाही योजना या जनतेपर्यंत पोहोचल्या जातील असे सुद्धा या कामांमध्ये ही माहिती पुरवली जाणार आहे.

शासनाच्या येणाऱ्या सर्व योजना ह्या जनतेपर्यंत पोहोचल्या जाणार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडवणीस यांचे पुढच्या येणाऱ्या काळात छाप नक्की पडणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment