नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा भारत बंदची हाक देण्यात आली आहे त्या सोमवारी दिनांक 27 रोजी हे आंदोलन होणार आहे.
नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा भारत बंद ची हाक देण्यात आलेले आहे. सोमवारी दिनांक 27 रोजी हे आंदोलन होणार आहे. केंद्रातील भाजप सरकारने कृषी कायदे पास करून वर्षभराचा कालावधी उलटला आहे. या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात तेव्हापासून शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मात्र या बंदचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही
गोंगटाशिवाय शांततेने हा बंद पाळला जाणार आहे असे जाहीर केले आहे. या भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना उस्फुर्त सहभाग घेऊ द्यावा. कार्यकर्त्यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेण्यासाठी कुणालाही शक्ती करू नका.
भारत बंद दरम्यान रुग्णालय, मेडिकल सुविधा, रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा यांच्यासारख्या तातडीच्या सेवा सुरू राहतील. अन्यथा या शिवाय इतर सर्व व्यवहार या दिवशी बंद ठेवण्याचे आव्हान किसान सभेच्या वतीने करण्यात आलेले आहे. याशिवाय निमशासकीय कर्मचारी, शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था अधिक आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे.
देशातील शेतकऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन हे योग्य आहे. ही आत्मसन्मानाची ही लढाई नाही ही देशाच्या अन्नदात्यांच्या अधिकाराची लढायी आहे. म्हणून देशातील अन्नदाता कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर उतरलेत. म्हणूनच शेतकरी मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरलेत.