केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीवीर योजनेंतर्गत अग्नि भरती प्रक्रिया हे दुसरे वेळेस नागपुरात राबविण्यात येत आहे. तरी येत्या 10 जूनपासून ही भरती प्रक्रिया मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात होईल. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना चार वर्षासाठी सैन्यात नोकरी करता येणार आहे.

अग्नि वीर सैन्य भरती मेळावा / Agniveer Bharti
अग्नि वीर सैन्य भरतीसंदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या अध्यक्षेतेखाली सैन्य भरती संदर्भातील आढावा व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूरच्या सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल आर. जगत नारायण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. बुलढाणा वगळता विदर्भातील 10 जिल्ह्यांतील युवकांना या नागपूर सैन्य भरती मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. तरी या मेळाव्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावयाचा आहे.
नागपुर अग्नि वीर भरती माहिती / Nagpur Agniveer Bharti Information in Marathi
या अग्नि वीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक आर्थिक मानधन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. चार वर्षानंतर या अग्निबाणांना निवृत्त केले जाईल मात्र यातील 25 टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. त्यासाठी आणखी सहा महिन्याचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची तरतूदही या योजनेमध्ये केलेली आहे.
तरी याअंतर्गत भरतीची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. तरी नोंदणी केलेल्या उमेदवारांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी आता लवकरच होणार आहे. त्यांतर्गत 10 ते 17 जून दरम्यान ही भरती प्रक्रिया मानकापूर येथे होईल. नागपुर येथे होणारी भरती प्रक्रियेत नागपूर, वर्धा, वाशीम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, अकोला, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांतील युवकांना भारती मध्ये सहभागी होता येणार आहे.
तरी या प्रक्रियेत बुलढाणा येथील उमेदवारांना सहभागी होता येणार नाही. भरती प्रक्रियाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भरतीमध्ये अग्नि वीर जनरल ड्यूटी, अग्नि वीर टेक्निकल, अग्नीवीर ट्रेडसमन, अग्निवीर स्टोर कीपर या पदांची पूर्तता होणार असल्याची माहिती मिळाली आहे तरी यासाठी आठवी ते दहावी अश्या प्रकारची पात्रता ठेवण्यात आलेली आहे.
नागपुर सैन्य भरती वेळापत्रक I Nagpur Bharti Time Table 2023
10 जून : भंडारा, गडचिरोली
11 जून : वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, मूर्तिजापूर तालुका
12 जून : अकोला, मूर्तिजापूर वगळून सर्व तालुके, नागपुर
13 जून : अमरावती, गोंदिया, वर्धा
14 जून : सर्व जिल्हे
15, 16, 17 जून : वैद्यकीय चाचणी
नागपुर अग्नि वीर भरती साठी आवश्यक कागदपत्रे I Nagpur Agniveer Bharti Documents
- 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- क्रीडा प्रमाणपत्र
- अविवाहित प्रमाणपत्र
- सैन्यसंबंधी प्रमाणपत्र
- एनसीसी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- डीओबी प्रमाणपत्र
इत्यादि कागदपत्रे नागपुर सैन्य भरतीसाठी आवश्यक आहेत.
हेही वाचा :
- महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 जागांसाठी भरती
- कुसुम सोलार पंप योजना संपूर्ण माहिती एका क्लिकवर