Wednesday, September 27, 2023
HomenewsAppasaheb dharmadhikari Maharashtra Bhushan : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र...

Appasaheb dharmadhikari Maharashtra Bhushan : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज गौरव

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने Appasaheb dharmadhikari Maharashtra Bhushan award आज गौरविण्यात आलेला आहे.

आज झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तरी नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा आज पार पडला.

या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते मंडळी या ठिकाणी हजेरी लावलेली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती या ठिकाणी लावलेली होती.

ज्येष्ठ निरूपण कार आणि पद्मश्री किताब  Padma Shri Kitab Dr Appasaheb Dharmadhikari आणि सन्मानित डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहिरात करण्यात आलेला होता. त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा इथल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

या सोहळ्याच्या मुख्य व्यासपीठाची निर्मिती देखील एखाद्या किल्ल्याप्रमाणे करण्यात येत आहे. या मुख्य व्यासपीठावर सर्वांनी बसायचे अनुमती नसल्याने दोन्ही बाजूला व्हीआयपी आमंत्रितांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यासपीठासमोर अनुयायांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पासेसवर क्यू आर कोड देण्यात आले आहेत.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा आढावा. A review of the work of Appasaheb Dharmadhikari

श्रीमत् दासबोधाच्या निरूपणातून समाज घडवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.

त्यांच्या वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे दखल संपूर्ण जगातून घेण्यात आली आहे.

अंधश्रद्धेवर प्रहार व्यसनमुक्ती लोकशिक्षण यावर त्यांनी कायम भर दिलेला आहे.

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव, वाड्या, शहर स्वच्छ करण्याचा दैनंदिन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

त्यांचे समाजाप्रती असलेले काम पाहून भारत सरकारने याआधी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments