12 ते 14 वयोगटातील लसीकरण 16 मार्च पासून सुरु होणार पहा इथे संपूर्ण माहिती

12 ते 14 वयोगटातील लसीकरण 16 मार्च पासून सुरू होणार आहे असे जाहीर करण्यात आले असून देशभरात कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरली असली तरी देखील अद्यापही नवीन कोरोना बाधित आढळून येत आहेत.

शिवाय कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू देखील सुरू आहेत असे आपल्याला दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलेले आहे. त्यानुसार आता देशभरात 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले जाणार आहे.
या मुलांना कोरोना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला असून येत्या बुधवारपासून म्हणजेच 16 मार्च पासून 12 ते 14 वयोगटातील मुलांना हि कोरोनावरील लस दिली जाणार आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला 15 वर्षावरील मुलांचे लसीकरण सुरुवात करण्यात आले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे असे आरोग्यमंत्री मांडवीया यांनी ट्विटरवर म्हटले आहे. तसेच 60 वर्षावरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बुस्टर डोस दीला जाणार आहे. मुलांच्या कुटुंबीयांना आणि 60 वर्षावरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो असे मांडविया यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top