10th and 12th Re Exam Time Table I 10वी व 12वीची फेर परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार पहा इथे संपूर्ण वेळापत्रक

10th and 12th Re Exam Time Table : दहावी बारावीच्या बोर्डाने परीक्षा वेळापत्रक जाहीर केलेले आहे तरी दहावी बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षा ही 18 जुलै पासून सुरू होणार आहे तरी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या परीक्षा लवकर घेतल्या जात आहेत.

बोर्डाने बारावीच्या परीक्षा (12th re exam) ह्या 18 जुलै ते 8 ऑगस्ट या दरम्यान होतील असे घोषित केलेले आहे. तर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या परीक्षा या 18 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होतील असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ करून दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या जुलै आणि ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक हे जाहीर केलेले आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ह्या 18 जुलैपासून सुरू होणार आहेत तर राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी ही माहिती दिलेली आहे.

Maharashtra Board Re-examination

दहावी बारावीच्या लेखी पुरवणी परीक्षा या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभाग मंडळामार्फत घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. दहावीच्या (10th re exam date 2023) विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या 18 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान होईल तसेच बारावीच्या परीक्षा (12th re exam 2023) प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ह्या 18 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होतील.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेचे वेळापत्रक पहावयाचे असेल तर मंडळाच्या वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले वेळापत्रक पाहू शकतात.

Re-exam Time Table : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे फेर परीक्षेचे वेळापत्रक हे मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे. या मंडळाच्या वेबसाईटवरील वेळापत्रक हे विद्यार्थ्यांना माहितीसाठी वेळापत्रक दिलेले आहे परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात मंडळ देण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यांनी आपले वेळापत्रक हे आपल्या शाळेमध्ये आलेले अंतिम वेळापत्रक असेल.

शाळांना प्राप्त झालेल्या वेळापत्रकावरून परीक्षांच्या तारखांची खात्री करून घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या दहावी बारावी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. इतर कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच इतर सोशल मीडियावर तत्सम माध्यमातून वेळापत्रक हे ग्राह्य धरू नये असे आवाहन ओक यांनी केलेले आहे.

या फेर परीक्षेचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत तरी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जुलै ऑगस्ट मध्ये होणारे परीक्षेचे फॉर्म त्यांच्या माध्यमिक शाळा कनिष्ठ विद्यालयात मार्फत भरण्यात यावे.

ऑनलाइन फॉर्म संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना

  • ऑनलाइन फॉर्म हे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदत वाढ करण्यात येणार नाही.
  • श्रेणीनुसार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी मार्च 2023 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै ऑगस्ट व फेब्रुवारी मार्च 2024 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावयाची आहे.
  • सर्व मंडळातील उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करण्यात याव्यात.
  • ऑनलाइन फॉर्म भरताना फेब्रुवारी मार्च 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये ऑनलाईन घेता येईल.

हेही वाचा :

सर्वात पहिल्यांदा माहिती मिळवण्यासाठी आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment