रेशन कार्ड ऑनलाइन कसे पाहायचे How to view ration card online

रेशन कार्ड ऑनलाइन कसे पहायचे How to view ration card online

How to view ration card online

01) तुम्हाला तुमचा एक आरसी नंबर (RC Number) मिळाला की तुम्ही रेशन कार्ड ही ऑनलाईन पाहू शकता.

02) त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचा आहे.
03) त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेज वरील उजवीकडील Ration card या पर्यायाच्या खालील Know your ration card या वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
04) त्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा टाकून Verify या बटणावर क्लिक करायचा आहे.

रेशन कार्ड ऑनलाइन कसे पाहायचे How to view ration card online

05) त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड नंबर पाहिला तो तुम्हाला येथे टाकायचा आहे तो टाकल्यानंतर समोरील View report या बटणावर क्लिक करायचा आहे. 
06) त्यानंतर तुमच्या समोर एक रेशन कार्ड संबंधित माहिती ओपन होईल. 
07) स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print your ration card असा एक पर्याय तुम्हाला दिसेल. 
08) यावर क्लिक केले की तुम्ही तुमचे रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचे नाव आणि पत्ता रेशन कार्ड दुकानदाराचा नंबर, नाव व पत्ता कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती तसेच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळत आहे ते किती मिळायला हवं याची माहिती दिलेली असते.

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे म्हणजे हे रेशन कार्ड तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकणार नाहीत. तशी स्पष्ट सूचना ही इथे दिलेली आहे. ही सुविधा तुम्हाला तुमचे रेशन कार्ड ऑनलाइन बघण्यात यावे केवळ यासाठीच उपलब्ध करून देण्यात आलेली ही सुविधा आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment