मध्यवर्ती बँकेची संपूर्ण माहिती मराठी Central Bank Information Marathi

मध्यवर्ती बँक माहिती मराठी: प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक असते देशाची मध्यवर्ती बँक हे त्या देशाच्या वित्तीय सार्वभौमत्वाचे व स्थैर्याची प्रतीक समजले जाते. 

मध्यवर्ती बँक ही अशी संस्था असते की जी देशाची वित्तीय ताकद व स्थैर्याला संरक्षण देण्यास जबाबदार ठरते तसेच ती वित्त व्यवस्थेतील सर्व राखीव निधी तयार करणारे सर्वोच्च संस्था आहे. चलन आणि पत पैशाच्या स्वरूपातील खरेदी शक्ती नियंत्रित करून देशाची सरकारी बँक म्हणून काम पाहते. मध्यवर्ती बँकेचे महत्त्व अनेकविध कारणांनी सतत वाढत आहे. 
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आर्थिक स्थैर्यावर परिणाम करणार्या निरनिराळ्या गतिमान परंतु गुंतागुंतीच्या व संघर्षमय बाबी यांचा समन्वय नियंत्रण व व्यवस्थापन करण्याचे कार्य मध्यवर्ती बँका करीत आहेत. रिक्स बॅक ऑफ स्वीडन ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक आहे. तिची स्थापना सन 1968 मध्ये झालेले आहे.
मध्यवर्ती बँकेच्या काही व्याख्या
अर्थव्यवस्थेतील पतपुरवठा वर नियंत्रण ठेवणारी बक म्हणजे मध्यवर्ती बँक होय.
जी संस्था अंतिम कर्ज दाता म्हणून काम करते तिला मध्यवर्ती बँक असे म्हणतात.
जी संस्था बँकांची बँक म्हणून काम करते तसेच तिचे कर्तव्य उच्च शक्ती पैशावर नियंत्रण ठेवून देशाचा चलनविषयक आधार नियंत्रित करणे आणि समाजातील लोकांच्या पैशाच्या पतपुरवठा वर नियंत्रण व नियमन घालने असे असते ती संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक होय.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment