भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती bhaubeej information in Marathi

भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती मराठी Bhaubeej information in marathi

भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी असतो हा महाराष्ट्रीयन पद्धतीचा दिवाळीतला हा सहावा दिवस असतो या सणास हिंदीत भाई दूज असे म्हणतात. तसेही दिवाळी हा सण आला म्हणजे आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची प्रथा असते म्हणून बहिण भाऊ यांचा सण म्हणजेच भाऊबीज.

दिवाळीचे दिवस सर्वत्र आनंद व उत्साह चैतन्य भरभराट घेऊन येणारे असतात नैराश्याचे मळभ दूर सारून सर्वत्र चैतन्याचा सडा शिंपणारा हा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो आणि म्हणूनच या सणाच्या आपण वर्षभर आतुरतेने वाट देखील पाहत असतो या सणाची जवळपास 15 दिवस शाळांना सुट्टी असल्याने बच्चे कपनीची तर मजाच असते त्यामुळे त्यांना या सणाची आगळीवेगळी गोड असते शाळांना सुट्ट्या, फटाक्यांची आतिषबाजी, फराळावर मारता येणार ताव त्यामुळे 15 दिवस नुसतं धुडगूस असते.

भाऊबीज बद्दल माहिती bhaubeej in Marathi

भाऊबीज साजरा करण्यामागे आपल्या दोन बहीण आणि भावाचे प्रेमाचे महत्त्व आपल्याला येथे दिसून येते बहीण आणि भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया द्वितीया चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाची वर्णन होत राहो ही त्यामागची भूमिका असते.
या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी गोड धोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते भाऊ मग ओवाळणीचे ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो.
पौराणिक आणि कथेच्या दाखवल्याप्रमाणे आजच्या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिच्या घरी गेला आणि तिला वत्स्त्र अलंकाराच्या रुपात अनेक भेटवस्तू दिल्या तिच्या घरी भोजन केले त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया असे देखील म्हणतात या दिवशी यमुना स्नान करावे असे केल्याने वर्षभर यमाची भीती राहत नसल्याचे बोलले जाते.

भाऊबीज सण साजरा करण्याची पद्धत / Mathod of celebrating bhaubeej festival

या दिवशी भावाला तेल उटणे लावून अंघोळ घालावी.
बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे.
भावाने बहिणीकडे जाणे आणि बहिणीने भावाला ओवाळावे.
एखाद्या स्त्रीला भाव नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. 
भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी. 
अपमृत्यु निवारणार्थ यादिवशी यमाला दीप दान करावे.

भाऊबीज विधी bhaubij vidhi

अपमृत्यु निवारणार्थ श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पण करिष्ये | असा संकल्प करून तर्पण करावयचे. हा विधी पंचांगात दिला आहे, तो पहावा.
भाऊबीजला बहिणीने भावाला टिळा लावून त्याला ओवाळावे.
त्यानंतर बहिणीने भावाच्या हाताला लाल पिवळा धागा बांधावा 
त्यानंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा.

भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती मराठी  Bhaubeej information in marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment