फेसबूक मार्केटींग l Facebook Marketing

फेसबुक मार्केटिंग   l   What is facebook marketing

        मित्रांनो काही वर्षांपूर्वी मार्केटिंग म्हणजे पेपर मध्ये जाहिरात देणे आपल्या व्यवसायासंबंधी एखादी पॅम्प्लेट बनवून ते न्युज पेपर मध्ये टाकून लोकांपर्यंत पोहोचवणे किंवा रस्त्यावर होर्डिंग लावून आपल्या व्यवसायाची माहिती लोकांना देणे अशा प्रकारे आपण मार्केटिंग करत होतो पण आता स्मार्टफोन आणि नेट च्या युगात या गोष्टी मागे पडू लागले आहेत. डिजिटल मार्केटिंग हे तुमच्या व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे त्याचा नक्की फायदा घ्या.
        तुमच्या व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही फेसबुक मार्केटिंग इंस्टाग्राम मार्केटिंग चा वापर करू शकतात या सर्विस खूप कमी पैशात तुमची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतात याबद्दल सविस्तर माहिती आपण खाली फेसबुक मार्केटिंग विषयी माहिती पाहणार आहोत.

फेसबुक मार्केटिंग म्हणजे काय

मित्रांनो आज आपण फेसबुक मार्केटिंग बद्दल माहिती घेणार आहोत. डिजिटल मार्केटिंग चा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा याबद्दल आपण माहिती घेऊ या लेखात आपण फेसबुक मार्केटिंग बद्दल माहिती घेणार आहेत.
डिजिटल मार्केटिंग साठी फेसबुक मार्केटिंग हा सर्वात उत्तम पर्याय आहे फेसबुक ही एक मोठी कंपनी आहे आणि ही कंपनी तुमच्या व्यवसायाची जाहिरात सुद्धा करते त्यासाठी तुम्हाला फक्त थोडे पैसे खर्च करावे लागतात.
मित्रांनो आज पर्यंत तुम्ही फेसबुक फक्त टाईमपास करण्यासाठी युज करत असाल पण याच फेसबुक वरून आपण आपल्या बिजनेस ची जाहिरात किंवा यूट्यूब चैनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम, अँड्रॉइड ॲप यांची जाहिरात करून आपले प्रॉडक्ट लोकांपर्यंत अगदी आरामात आणि सहजरीत्या पोहोचवू शकतो.
तुम्ही फेसबुकवर पेज बनवू शकता ग्रुप बनवू शकता आणि हे पेज आणि ग्रुप एकमेकांना लिंक करू शकतात आणि या मार्फत तुम्ही तुमच्या बिझनेस ची जाहिरात अगदी फ्री करू शकतात पण तुम्हाला यासाठी थोडी मेहनत करावी लागेल फेसबुक पेज आणि ग्रुप वर लाईक आणि ग्रुपमध्ये मेंबर ऍड करणे त्यांना ॲक्टिव ठेवणे तुमची हि मेहनत कमी करण्यासाठी फेसबूक ने तुमच्यासाठी एक टू ल आणले आहे. ज्यामार्फट तुम्ही तुमच्या बिजनेस ची जाहिरात अगदी सहजरीत्या करू शकता.
त्यासाठी फेसबुक वर लॉग इन व्हा आणि लेफ्ट सीडी ला एकदम खाली एक Ad असा ऑप्शन असेल त्यावर जावा आणि तुमच्या बिजनेस ची ऍड करा काही गोष्टी लिहा तुम्हाला किती रुपयात जाहिरात करायचे आहे, ते निवडा तुमची जाहिरात कोणत्या शहरात पोहोचली पाहिजे जाहिरात कधी पोहोचावी याचा टाईम आणि तुम्ही यासठी किती पैसे खर्च करायचे आहेत, हे तुम्ही ठरवा आणि तुमची जाहिरात अपलोड करा. थोड्याच वेळात तुम्हाला याचे Results दिसायला लागतील फेसबुक वर तुम्ही 1 डॉलर म्हणजे 60 रुपये खर्च करून जाहिरात केला तर फेसबुक तुमची ही जाहिरात 1000 लोकांपर्यंत पोहोचत होते म्हणजे 60 रुपयात 1000 लोक तुमची जाहिरात पाहू शकतात. आणि खूप Trusted मेथड आहे. यामध्ये तुमची फसवणूक होत नाही फेसबूक नेटवर्क हे इतर सर्व सोशल नेटवर्क पेक्षा खूप मोठं नेटवर्क आहे. आणि गेल्या काही वर्षात फेसबुक मध्ये खूप चांगले बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे फेसबुक वर जाहिरात करणं तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरेल. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्याचा विचार करत असाल तर सुरुवात ही फेसबुक मार्केटिंग पासुनच करा….
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment