काय आहे कृषि कर्ज मित्र योजना? पहा इथे संपूर्ण माहिती Krishi Karj Mitra Yojana Information Marathi

Agricultural loan scheme information Marathi : आज आपण महाराष्ट्र शासनाच्या नवीन कृषी कर्ज योजने संदर्भात माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. काय आहे ही योजना, या योजनेची स्वरूप काय, कृषी कर्ज मित्र नोंदणी प्रक्रिया, प्रकरण करण्यासाठी सेवा शुल्क चा दर किती असणार? योजनेचा कालावधी किती निधीचा स्रोत व रक्कम किती? या बाबतची माहिती आपणास या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

कृषी कर्ज योजनेचे स्वरूप काय? What is the nature of agricultural loan scheme?

दरवर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकरी पीक कर्ज घेत असतात. लागवडीखालील क्षेत्र व एकूण पीक कर्ज वाटप पाहिले असता यात विषमता आढळून येते. कृषि क्षेत्रात भांडवलाचा ओघ व गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या विकासात भर पाडणे आवश्यक आहे. निरीक्षण केल्यास तेच तेच लाभार्थी वेगवेगळ्या बाबींसाठी कर्ज घेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या शेती क्षेत्रात विकास झालेला दिसून येतो. या व्यतिरिक्त शेतकरी ज्यांना कर्ज घेण्याची इच्छा आहे, परंतु या कर्जाच्या प्रक्रियेचे ज्ञान नसल्यामुळे आणि वेळेच्या अभावामुळे त्यांना कर्ज मिळणे शक्य होत नाही.

कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्दिष्ट काय? What is the objective of Krishi Karj Mitra Yojana?

शेतकऱ्यांना कृषी कर्जाची उपलब्धता सहजतेने आणि कमीत कमी वेळेत करून देणे आणि या व्दारे भांडवलाची गुंतवणूक वाढून कृषी शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात विना विलंब कर्ज उपलब्ध करून देणे. सावकाराच्या जास्त व्याजाच्या कर्जापासून शेतकऱ्यांची सुटका करणे.

कृषी कर्ज मित्र नोंदणी कशी करायची How to register an agricultural loan friend

  • कृषिकर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर कृषिकर्ज मित्र नोंदणी करायची आहे.
  • नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
  • जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार असतील.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment