होळी सणाची माहिती मराठी Holi information in Marathi

Holi information in Marathi : होळी या सणाची माहिती पुढीलप्रमाणे

होळी हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जात असतो. होळी सण एक महत्त्वाचा आणि भारतीय व नेपाळी  लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जात असतो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करत असतात. तर काही ठिकाणी एक दिवस सुद्धा साजरा करत असतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जात असते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी सुद्धा खेळली जात असते. ज्याला आपण सर्वजण धुलीवंदन असे म्हणत असतो.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा हा होळी सण Holi festival भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा हा होळी सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन अशी विविध प्रकारची नावे सुद्धा आहेत.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळी, कटाची आमटी, मसालेभात अशा प्रकारचे पंचपक्वान सुद्धा सर्व बांधव आपल्या घरी करत असतात.
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी विशेष म्हणजे समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात.

होळी का साजरी केली जाते? Why Holi is celebrated

होळी या सणाबद्दल हिंदू लोकांचा असा समज आहे की येणार्‍या वसंत ऋतूचा विपुल रंगांचा आनंद घेण्यासाठी हा रंगांचा सण म्हणून होळी सण साजरा केला जातो. आणि त्याला निरोप दिला जातो अशा प्रकारे हा होळी सण साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

होळी सणाचा इतिहास History of Holi

जर हा सण सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात असला तरी हा सण भारतामधील ब्रज या प्रदेशातील भगवान श्रीकृष्णांच्या मथुरा, वृंदावन, बरसाना आणि नंदागाव या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. म्हणूनच या ठिकाणी होळी या सणाचा काळामध्ये या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. या गर्दीमध्ये या होळी सणा दिवशी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment