सांबर रेसिपी मराठी I Sambar Recipe in Marathi

Sambar Recipe in Marathi : सांबर हा पदार्थ दक्षिण भारतीय प्रकार असून हा पदार्थ भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या फरकाने बनवला जातो सामान्यपणे बनवला जाणारा सांबर हा पदार्थ तूरडाळ कोकम आणि सांबर पावडर पासून बनवला जातो आता आपण सांबर हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्या साठी कोण कोणत्याची आवश्यकता आहे ते आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

सांबर बनवण्यासाठी आवश्यक साहित्य 

 • एक वाटी तूरडाळ 
 • दोन चमचे सांबर मसाला पावडर 
 • एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला 
 • दोन मोठे कांदे बारीक चिरलेले 
 • एक चमचा आलं लसूण पेस्ट 
 • दोन शेवग्याच्या शेंगा तुकडे केलेले
 • दोन चमचे चिंच कोळ
 • दोन चमचे लाल मिरची पावडर 
 • एक चमचा मोहरी 
 • एक मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर 
 • मीठ तुमच्या चवीनुसार 
 • दोन मोठे चमचे तेल
 • १/४ चमचा हिंग
 • १/४ चमचा हळद

सांबर बनवण्यासाठी केली जाणारी कृती

 • तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांबर बनवताना तूरडाळ घ्या आणि ती स्वच्छ निवडून घेऊन ते एका चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घ्या.
 • मग स्वच्छ धुतलेली तूर डाळ कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये दोन ते अडीच वाटी घालून त्याचे झाकण लावून कुकर गॅसवर मध्यम आचेवर ठेवून त्याला चार ते पाच शिट्ट्या द्या. त्यामुळे तुमची डाळ चांगल्या प्रकारे आणि मऊ शिजण्यास मदत होते.
 • चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही गॅस बंद करा आणि थोडा वेळ म्हणजेच दहा ते पंधरा मिनिटे कुकर चे झाकण न उघडता तसेच ठेवा त्यामध्ये डाळ चांगल्या प्रकारे शिजेल.
 • आता एक कढई घ्या आणि ती मध्यम गॅसवर गरम करण्यास ठेवा आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा. एकदा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाका आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच हिंग, लसूण आणि कांदा घाला आणि ते चांगल्या प्रकारे भाजून घ्या.
 • त्यानंतर आता बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि ते चांगले भाजून त्याच्यावर झाकण घालून ठेवा व ते दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या आणि मग त्यावरील झाकण काढून त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाका आणि ते चांगले भाजून घ्या.
 • मग त्यामध्ये चिंचेचा कोळ, लाल तिखट, हळद, सांबर पावडर आणि मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि थोडा वळ ते चांगले मिक्स करत राहा.
 • मग त्यामध्ये शिजलेली डाळ घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि जर डाळ घातल्यानंतर ते खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी घाला आणि ते एक 7 ते 8 मिनिटे मध्यम गॅसवर शिजवा.
 • मग त्यानंतर सांभर वडी कोथिंबीर टाका आणि तुमचे सांबर इडली डोसा किंवा मेदु वडा सोबत खाण्यासाठी तयार झालेले आहे.
हेही वाचा :
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment