संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांची नावे Names of Talkaryas of Sant Tukaram Maharaj

संत तुकाराम इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते त्यांचा जन्म वसंत पंचमीला माग शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल व विठोबा हे संत तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरु म्हणून सुद्धा ओळखले जाते. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.

आज आपण संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांची नावे पाहणार आहोत ते खालील प्रमाणे Names of Talkaryas of Sant Tukaram Maharaj 

संत तुकाराम महाराजांचे मुख्य द्रुपद टाळकरी यांचे नावे खालील प्रमाणे यांचा सर्वांचा उल्लेख मोहब्बत बाबा यांनी नेहमीच उल्लेख केला आहे.
 1. महादजी कुलकर्णी यांचा उल्लेख संत बहिणाबाई यांच्या वाङ्मयात आहे.
 2. गंगाधर बाबा मावळ – तळेगाव.
 3. संताजी तेली जगनाडे – चाकणकर हे संत तुकाराम यांचे अभंग लिहिणारे म्हणून ओळखले जातात.
 4. तुकाराम महाराजांचे बंधु कान्होबा.
 5. मालोजी गावडे – येवलेवाडी तुकाराम महाराज यांचे जावई 
 6. धोंडोपंत लोहकरे – लोहगाव 
 7. गवार शेट वाणी – सदुंबरे 
 8. मल्हार पंत कुलकर्णी – चिखली 
 9. आबाजी पंत – लोहगावकर 
 10. रामेश्वर पंत – बहुलकर 
 11. कोंडप्पा पाटील – लोहगाव 
 12. नावाजी माळी – लोहगाव 
 13. शिवबा कासार – लोहगाव 
 14. सोनबा ठाकूर – हे मृदुंगाची साथ करीत असत.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment