Monday, October 2, 2023
Homenewsशैक्षणिक कर्ज बद्दल संपूर्ण माहिती मराठी Education loan information in Marathi

शैक्षणिक कर्ज बद्दल संपूर्ण माहिती मराठी Education loan information in Marathi

Education loan information in Marathi: तुम्ही पाहत असाल की आज अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की शैक्षणिक कर्ज कसे घ्यायचे कारण हे असे कर्ज आहे जवळ जवळ प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक आहे त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा विद्यार्थ्यांना या शैक्षणिक कर्जाचे  ( Education Loan ) अत्यंत आवश्यकता असते. कारण विद्यार्थी जेव्हा बारावी उत्तीर्ण होतो तेव्हा त्याला पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी अनेकदा अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते कारण बारावी नंतर विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठात महाविद्यालयात कोणत्याही पदवीसाठी प्रवेश घेण्यासाठी जातो तेव्हा ते अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ते खूप पैसा लागत असतो.

आपण पाच वर्षांपूर्वी च्या शिक्षणापेक्षा आज शैक्षणिक कर्ज Loan मिळवणे सोपे आणि स्वस्त आहे. शिवाय शिक्षणाच्या वाढत्या किमतीमुळे शैक्षणिक कर्ज ही एक सुविधा बनलेली आहे ज्या आधरे विद्यार्थी आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतात.

शैक्षणिक कर्ज म्हणजे काय / What is an educational loan?

शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी घेतलेल्या खर्चाला शैक्षणिक कर्ज ( Education Loan ) असे म्हणतात शैक्षणिक कर्ज घेण्याचा मुख्य हेतु म्हणजे पुस्तके पोषण कॉलेज पी आणि जर विद्यार्थी घरापासून दूर होस्टेलमध्ये राहत असेल तर तेथील खर्च भागविणे शैक्षणिक कर्ज हे मुळात माध्यमिक शिक्षणानंतर म्हणजेच बारावी नंतर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कर्ज / Education Loan दिले जाते.

बँक हे कोणत्या गोष्टींसाठी कर्ज देतात / What do banks lend for?

  • महाविद्यालय / शाळा / वसतिगृह शुल्क 
  • परीक्षा ग्रंथालय प्रयोगशाळा शुल्क 
  • लागू असल्यास विद्यार्थ्यांसाठी जीवन विमा प्रीमियम पुस्तके उपकरणे गणवेश यासाठी कर्ज 
  • कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यास संगणकाचे वाजवी किमतीवर खरेदी 
  • अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणार आहे तर कोणताही खर्च जसे की अभ्यास दौरे प्रकल्पांचे काम प्रबंध इत्यादी.

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत / What documents are required to get an educational loan?

शैक्षणिक कर्ज घेताना तुम्हाला बँकेच्या कार्यप्रणाली ला काही कागदपत्रे पुरावे लागतात हे कागदपत्रे शैक्षणिक कर्जाचा मुख्य पाया असतो तर सामान्यता शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासते याची माहिती खालील प्रमाणे
  • ओळखपत्रासाठी पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / मतदान कार्ड
  • रहिवासी पुराव्यासाठी टेलिफोन बिल / विजेचे बिल / रहिवासी दाखला / आधार कार्ड 
  • तुमचा फोटो 
  • प्रवेश परीक्षेचा निकाल त्यामुळे तुमचे ऍडमिशन कन्फर्म झाले आहे. ह्याची माहिती मिळेल जसे की JEE,CET,NEET आणि अधिक.
  •  10 वी आणि 12 वी ची गुणपत्रिका 
  • ज्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला आहे तेथील पत्र 
  • तुम्ही घेतलेल्या कोर्सच्या फि चा संपूर्ण आराखडा 
  • जर ह्या आधी तुम्ही कोणतेही कर्ज घेतले असेल, तर कर्जाची माहिती दाखवणारे कागदपत्र जसे की लोन अकाऊंट क्रमांक, बँकेचे स्टेटमेंट इत्यादी.

शैक्षणिक कर्ज घेण्याची पात्रता How much is the eligibility for an educational loan?

  • हे कर्ज फक्त भारतातील विद्यार्थ्यांना घेता येऊ शकते. 
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 18 ते 30 वर्षे या दरम्यान असावे. 
  • विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चे कर्ज दिले जाते.
  • जर विद्यार्थ्याकडे आधीच कर्ज नसेल तरच तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments