शिवाजी महाराजांच्या नाविक मोहिमा विषयी माहिती | Information about Shivaji Maharaj’s naval expeditions

आपण शिवाजी महाराजांच्या नाविक मोहिमां विषयी माहिती पाहणार आहोत । Information about Shivaji Maharaj’s naval expeditions

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नाविक दलाचे महत्त्व जाणणारा व स्वतंत्र नाविक दलाची उभारणी करणारा एकमेव राज्यकर्ता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.

१ ) बसरुरची स्वारी ( 1665 )

महाराजांनी 85 गलबते घेऊन कारवार जिल्ह्यातील बसरुर बंदरावर स्वारी केली व ते लुटले. या नाविक मोहिमेत ते स्वतः सामील झाले होते या स्वारीमुळे मराठ्यांच्या नाईक सामर्थ्याचे प्रदर्शन झाले.

२ ) खांदेरी बेट 

मुंबई बंदरापासुन सुमारे 15 सागरी मैल दक्षिणेस खांदेरी व उंदेरी ही दोन छोटी बेटे आहेत. त्यांमध्ये खांदेरी हे बेट मोठे आहे. या बेटावरून मुंबई बंदरातील जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते. ( महाराजांना मुंबईतील इंग्रजांच्या धोक्याची जाणीव होती. ) या बेटांवर पाणी नसल्याने इंग्रज व पोर्तुगीज यांनी त्याकडे लक्ष दिले नव्हते. राजांनी खांदेरीची पद्धतशीर पाहणी करून पाणी शोधून काढले.1679 मध्ये त्यांनी तेथे किल्ल्याचे बांधकाम सुरू केले त्यानंतर इंग्रज जागे झाले व त्यांनी राजांना विरोध केला; पण राजांनी आपले आरमार व सैनिक पाठवून खांदेरी चे रक्षण केले. इंग्रजांशी आरमारी चकमकीही झाल्या.मुरुड व जंजिरा येथील सिद्धिसत्तेने मराठ्यांना विरोध केला व उंदेरी बेट व्यापले. खांदेरी बेट व्यापण्यात महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. मराठ्यांनी खांदेरी बेट व्यपल्यामुळे मुंबई स्थित असलेल्या इंग्रजांना नाविक शह मिळाला.

३ )जंजिरा किल्ला व शिवाजीराजे 

रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळ भर समुद्रात जंजिरा ( म्हणजे जलदुर्ग ) हा सागरी किल्ला आहे. सतराव्या शतकात किल्ल्याचे सुभेदारी सिद्धांनकडे होती. जुलमी सिद्धीसत्ता स्वराज्याची शत्रू होती. त्यामुळे जंजिरा जिंकण्याचे महाराजांनी अनेक प्रयत्न केले; पण त्यात त्यांना यश आले नाही.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment