शिवनेरी किल्ला माहिती मराठी l Shivneri Fort Information In Marathi

शिवनेरी किल्ला/Shivneri Killa हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरी हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे, इ. स.  1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झालेला आहे. हा किल्ला महाराष्ट्रात नाहीतर भारतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. 
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. 
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आता एक महत्त्वाचे स्थान आहे.

शिवनेरी किल्ला फोटोज/Shivneri Fort Photos

किल्ल्याचे प्रवेशद्वार

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी का ठेवले?Why was Chhatrapati Shivaji Maharaj named Shivaji?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि 19 फेब्रुवारी 1930 मध्ये शिवनेरी या किल्ल्यावर झाला होता. आणि शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे आणि याशिवाय देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले होते.

गडावर जाण्यासाठी प्रमुख वाटा कोणत्या?What is the main way to reach the fort?

गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
शिवनेरी वर जाण्यासाठी सर्वात जवळचे मुख्य शहर म्हणजे पुणे आणि आपण पुण्यातून बसणे किंवा रेल्वेने जाऊ शकतो पुणे ते शिवनेरी किल्ल्याचे अंतर 90 किलोमीटर इतके आहे. आणि तुम्ही पुण्यातून पिंपरी रेल्वे स्टेशन ते शिवाजीनगर रेल्वे स्टेशन किंवा पुणे जंक्शन हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. त्याशिवाय तुम्ही मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे आणि शिवनेरीचे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
शिवनेरी किल्ला हा एक डोंगरी भागातील किल्ला आहे. जो पुण्याच्या उत्तरेकडच्या भागात आहे आणि जुन्नर त्याच्या आधार आहे.

किल्ल्याची उंची What is the height of the fort?

समुद्र समुद्रसपाटीपासून 1067 मीटर उंच

किल्ल्याचे ठिकाण What is the location of the fort?

जुन्नर, जि. पुणे, महाराष्ट्र

किल्ल्याचा प्रकार What is the type of fort?

गिरीदुर्ग
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment