Information about insurance in marathi विम्या विषयी माहिती मराठी
विम्याची कल्पना ही खूप जुनी कल्पना आहे जोखीम हि अनेकांमध्ये कशी वाटते येईल ही त्या मागची मुख्य कल्पना आहे इसवी सन पूर्व 2000 वर्षापासून चिनी आणि बॉबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी द्यायच्या असतील तर त्या वस्तू अनेक जहाजांत वाटायचे त्यामुळे एखादे जहाज बुडाले लुटले केले तरी सर्व त्रास होत नसतो इसवी सन पूर्व 1756 मध्ये ते बॉबिलोनियन व्यापाऱ्यांनी हमुरुबी कोड नावाची पद्धत सुरू केली त्यावेळी जहाजातून माल नेण्याकरिता व्यापाऱ्यांना कर्ज काढावे लागत असे. हमुरुबी कोड प्रमाणे जर या सफरीत चोरीला गेले बुडाले तर काढलेले कर्ज त्या व्यापाऱ्याला माफ करण्यात येईल परंतु व्यापार करून ते जहाज सुरक्षितपणे परत आले तर मात्र त्या व्यापाऱ्याला कर्ज देणाऱ्या कर्ज पेक्षा जास्त रक्कम द्यावे लागते.
What is insurance?
मानवी जीवन आणि संपत्ती ला असलेल्या संभाव्य जखमी पासून होणारे नुकसान टाळण्याचा किंवा कमी करण्याचा मानव प्रयत्न करत असतो व झालेल्या नुकसानीची भरपाई कशी करता येईल या विचारातून संरक्षणाची हमी मिळविण्यासाठी विमा या संकल्पनेचा उदय झालेला आहे विमा ही संकल्पना मानवाला नवीन नाही अनपेक्षित संकटामुळे संपत्ती अथवा जेवणला होणाऱ्या नुकसानीची शक्यता असणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन निधी तयार करून त्यामधून प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई करावयाची ही विम्याची मूलभूत कल्पना आहे या संकल्पनेची निर्मिती बॉबिलोयिन संस्कृतीत सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते भारतात देखील अगदी प्राचीन काळामध्ये ही विम्याची संकल्पना ही अस्तित्वात असल्याचे दिसून येत.
information about insurance in marathi
व्यक्तीच्या जीवनात तसेच त्याच्या व्यवसायात अनेक संकटे उद्भवू शकतात जसे अकाली मृत्यू अपघात आजारपण आग पूर ज्वालामुखी भूकंप चोरी वगैरे त्यामुळे व्यक्तीची उत्पन्न क्षमता कमी किंवा नष्ट होऊ शकते व्यवसायातील व इतर मालमत्तांच्या आर्थिक मूलवर विपरीत परिणाम होऊन त्यांचे उपभोग मूल्य उत्पादन क्षमता आयुष्य कमी होऊ शकते प्रसंगी संपुष्टात येऊ शकते कितीही दक्षता घेतली तरी ही संकटे आपल्याला टाळता येत नाहीत तथापि त्यांच्या पासून होणारे नुकसान भरून मिळविण्यासाठी व्यवस्था निर्माण करता येते विम्याचा इतिहास हा फार जुना इतिहास असून अगदी इसवी सन पूर्व चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातही बॉबिलोनियन संस्कृतीमध्ये सागरी विम्याचा वापर केला जात होता असे अनेक पुरावे सापडतात मात्र आधुनिक स्वरूपातील विमा व्यवसायात गेल्या तीनशे वर्षा पासून सुरुवात झालेली आहे याचा संपूर्ण जगभर प्रसार करण्याचे श्रेय बऱ्याच अंशी ब्रिटीशांना जाते.
भारतात विम्याची कल्पना खूप पूर्वीच लिखाणात वाचायला मिळते म्हणून स्मृती याज्ञव्यलक्य स्मृती कौटिल्याचे अर्थशास्त्र या पुस्तकात विम्याचा उल्लेख सापडतो योगक्षमं वहाम्यहम् हे भारतीय जीवन विमा निगम चे घोषणा वाक्य मनुस्मृती मधूनच घेतले आहे. सगळ्यांनी मिळून विम्याचे हप्ते भरायचे आणि त्याचे नुकसान असेल त्याला गरज असेल त्याला त्यातला थोडा वाटा द्यायचा असे ही कल्पना होती.
विम्याचे प्रकार कोणते What are the types of insurance
- आगीचा विमा
- आयुर्विमा
- आरोग्य विमा
- वाहन विमा
- अपघात विमा
अशा प्रकारचे विम्याचे प्रकार आहेत.